आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Motivational Story For Money Success And Love In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साधूंनी सांगितले आपल्याला धन, यश आणि प्रेम तिन्ही गोष्टी एकत्र केव्हा मिळतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिला घरात एकटी होती, तिला तीन साधू घराबाहेर उभे असलेले दिसले. महिला साधूंना म्हणाली, महाराज तुम्ही घरात यावे आणि भोजन ग्रहण करावे. साधूंनी विचारले तुमचा पती घरात आहे का? महिला म्हणाली, नाही सध्या मी एकटीच घरात आहे. त्यानंतर साधू म्हणाले तुमचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य घरी आल्यानंतर आम्हाला बोलवावे.


> संध्याकाळी महिलेचा पती आणि मुलगी घरी आले. महिलेने पतीला दिवस घरी घडलेला प्रसंग सांगितला. पतीनेही साधूंना जेवणासाठी बोलावण्यास होकार दिला. त्यानंतर महिला तिन्ही साधूंना बोलावण्यासाठी गेली.


> साधू म्हणाले आणि तिघेही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत.


> महिलेने विचारले असे का महाराज?


> साधू म्हणाले आमची नावे धन, यश आणि प्रेम अशी आहेत. तुम्ही तुमच्या पतीला विचारून यावे की, आमच्या तिघांपैकी ते कोणाला घरी बोलावण्यास इच्छुक आहेत.


> महिला पुन्हा घरी आली आणि पतीला सर्व गोष्ट सांगितली.


> पती म्हणाला आपण धनाला आपल्या घरी बोलावले पाहिले. असे केल्याने आपण धनवान होऊ शकतो.


> पत्नी म्हणाली आपण यश यांना घरी बोलावले पाहिजे. यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली गरिबी दूर होईल.


> तेवढ्यात या दोघांची मुलगी म्हणाली आपण प्रेम यांना घरी बोलावले पाहिजे. प्रेमापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पती-पत्नीने मुलीचा सल्ला मान्य केला.


> महिला साधुंकडे गेली आणि प्रेमला घरी जेवणासाठी आमंत्रण दिले.


> त्यानंतर प्रेम नावाचे साधू महिलेसोबत चाली लागले आणि त्यांच्या मागे दोन साधुही निघाले.


> महिले म्हणाली, महाराज तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही एकत्र कोणाच्याही घरी जात नाहीत मग आता का येत आहात?


> साधू म्हणाले, जर तुम्ही धन किंवा यश या दोघांपैकी एकाला बोलावले असते तर तुमच्या घरी एकच साधू आले असते. परंतु तुम्ही प्रेमला आमंत्रण दिले आहे. जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश आपोआप येतात.


कथेची शिकवण : या कथेची शिकवण अशी आहे की, आपण जीवनात सर्वात जास्त प्रेमाला महत्त्व देणे आवश्यक आहे. ज्या घरामध्ये प्रेम राहते तेथे सुख, शांती आणि संपन्नता राहते. घरामध्ये प्रेम राहिल्यास व्यक्ती धन संबंधित काम चांगल्याप्रकारे करू शकतो.