आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपले मन कधीही कोणत्याही गोष्टीने भरत नाही, सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक राजा दररोज सकाळी एखाद्या गरीबाची कोणतीही एक इच्छा पूर्ण करायचा. एके दिवशी सकाळी-सकाळी एक फकीर राजाच्या राजवाड्यात आला आणि म्हणाला महाराज माझे हे भांडे सुवर्ण मुद्रांनी भरून टाका.


> राजा म्हणाला हे खूपच छोटे काम आहे. मी लगेच हे भांडे सोन्याने भरून टाकतो. राजाने काही सुवर्ण मुद्रा त्या भांड्यात टाकल्या आणि त्या सर्व मुद्रा गायब झाल्या. हे पाहून राजा चकित झाला. त्याने आपल्या खजिन्यातून आणि मुद्रा मागवून घेतल्या आणि त्या सर्व मुद्रा भांड्यात टाकताच गायब झाल्या. त्यानंतर हळू-हळू राजाचा खजिना पूर्णपणे रिकामा झाला परंतु भांडे भरले नाही.


> राजाला वाटले की हे एखादे जादूचे भांडे आहे. यामुळे हे भरत नाहीये. राजाने फकिराला त्या भांड्याचे रहस्य विचारले.


> फकीराने उत्तर दिले की, महाराज हे भांडे आपल्या हृदयाने भरलेले आहे. ज्याप्रकारे आपले मन धन, पद आणि ज्ञानाने भरत नाही त्याचप्रमाणे हे भांडेसुद्धा कधीही भरू शकत नाही.


> आपल्याकडे किती पैसा आला, कितीही ज्ञान अर्जित केले, संपूर्ण जग जिंकले तरीही मनातील एखादी इच्छा अपूर्णच राहते. आपने मन या गोष्टींपासून भरण्यासाठी बनलेलेच नाही. जोपर्यंत आपले मन देवाला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत हे रिकामे राहते. यामुळे व्यक्तीने या मिथ्या गोष्टींच्या मागे धावू नये. आपल्या इच्छा अनंत आहेत आणि या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत.


> कथेची शिकवण - जेवढे आहे त्यामध्ये संतुष्ट राहावे आणि देवाचे ध्यान करावे. असे केले तरच जीवन सार्थक होते आणि मन शांत राहते.