आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेणतीही समस्या साेडवण्यासाठी अगाेदर त्याचे मूळ समजून घ्या!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान बुद्ध नेहमी आपल्या शिष्यांना प्रवचन देत हाेते. लाेक त्यांना निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असत. यापैकी अनेक प्रश्न लाेकांच्या व्यक्तिगत समस्येशी निगडित असायचे आणि गाैतम बुद्धांनी त्याची साेडवणूक करावी अशी त्यांची अपेक्षा असायची. बुद्ध त्यांच्याशी बराच वेळ बाेलत आणि समस्येची उकल करून देत असत. एक दिवस शिष्यांनी त्यांना विचारले- गुरुजी, आपण समस्या घेऊन येणाऱ्या लाेकांशी इतका दीर्घकाळ चर्चा का करीत असता? खरे तर तुम्ही तत्काळ समस्येची साेडवणूक करू शकता. बुद्धांनी शिष्यांना सांगितले, याचे उत्तर मी उद्या देईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते प्रवचनासाठी आले त्या वेळी त्यांच्या हाती दाेरी हाेती. काेणाशीही काहीही न बाेलता बुद्धांनी दाेरीस गाठ मारण्यास सुरुवात केली. आता शिष्यांच्या मनात कुतूहल वाढत हाेते, गुरुजी आता आपणास काय सांगतील... त्याच वेळी बुद्धांनी सर्वांना एक विचारला, मी या दाेरीला तीन गाठी मारल्या आहेत. आता मला हे समजून घ्यायचे आहे की हीच का ती दाेरी आहे, जी गाठी मारण्यापूर्वी हाेती? शिष्य विचारात गढून गेले. एक शिष्य म्हणाला- गुरुजी, हे पाहण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. पहिली बाब म्हणजे दाेरी तर तीच आहे, जी गाठ मारण्यापूर्वी हाेती. दुसरी बाब म्हणजे आता या दाेरीस तीन गाठी आहेत आणि ती पहिल्यासारखी नाही. म्हणजे दाेरीचा बाह्यभाग भलेही निराळा दिसत असला तरी आंतरिक रूप काही बदललेले नाही. बुद्धांनी सहमती दर्शवत मान डाेलावली आणि म्हटले, आता मी ही गाठ साेडत आहे, असे म्हणत दाेरीचे दाेन्ही टाेक पकडून जाेरजाेराने आेढू लागले. हे दृश्य पाहून एक शिष्य म्हणाला- गुरुजी, अशा पद्धतीने गाठ सुटण्याएेवजी आणखी गुंता वाढणार, त्यामुळे गाठ साेडवणे अजून कठीण हाेणार. भगवान बुद्ध म्हणाले, मग या गाठी साेडवण्यासाठी काय करावे लागेल. त्या वेळी एक शिष्य म्हणाला, ही गाठ कशा पद्धतीने मारली आहे ते अगाेदर पाहावे लागेल. त्यानंतर ती गाठ उकलण्याचा प्रयत्न करू शकताे. बुद्ध म्हणाले, मला हेच अपेक्षित हाेते. काेणीही काेणत्याही समस्येत कितीही अडकलेला असाे, जाेपर्यंत त्यास त्याचे मूळ शाेधता येत नाही ताेपर्यंत समस्येची उकल शक्य नसते.

शिकवण : बहुतेक लाेकांना आपल्या समस्येचे थेट समाधान हवे असते. वस्तुत: काेणत्याही समस्येची याेग्य आणि सुलभ पद्धतीने साेडवणूक करण्यासाठी त्याचे मूळ समजून घेणे जरुरी असते. याच संदर्भावर आधारित ही बाेधकथा.

बातम्या आणखी आहेत...