आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येय गाठण्यासाठी न घाबरता प्रत्येक क्षणाचा जे उपयोग करतात ते कधीच हार मानत नाहीत

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

एकदा एक शिष्य आपल्या गुरूला म्हणतो, मी माझे ध्येय कसे गाठू शकतो? गुरुजी त्याला विश्वासात घेऊन सांगतात की, आज रात्री मी त्याचे उत्तर देईन. शिष्य दररोज संध्याकाळी नदीतून पात्र भरून पाणी आणतो आणि रात्री त्याचा वापर करतो. पण गुरुजी त्याला पाणी न आणण्याची सूचना देतात. प्रश्नाचे उत्तर कधी देणार याची रात्री शिष्य गुरुजींना आठवण करून देतो. त्यानंतर गुरुजींनी शिष्याला एक दिवा दिला आणि पात्रातून पाणी भरून आणण्यास सांगितले. त्या दिवशी अमावास्या होती त्यामुळे खूप अंधार होता. तो शिष्य एवढ्या रात्री कधीच बाहेर गेला नव्हता. शेवटी तो गुरुजींना बोलला, गुरुजी, नदी इथून खूप दूर आहे आणि पुरेसा प्रकाशही नाही, त्यामुळे मला दिसत नाही. त्यामुळे इतका लांबचा प्रवास अंधारात नाही करू शकत. तुम्ही सकाळ होईपर्यंत वाट पाहा, उजेड पडला की मी पाणी घेऊन येईन. यावर गुरुजी म्हणतात, मला पाण्याची गरज आताच आहे, त्यामुळे तुला पाणी आणावे लागेल. आताच तू गेलं पाहिजे आणि माझ्यासाठी पाणी आणलं पाहिजे. शिष्य म्हणाला, अंधारात जाणं मला शक्य नाही. गुरुजी म्हणाले, अंधाराला का बघतो मूर्खा, समोर उजेड बघायचा आणि पुढं जायचं. उजेड तुझ्या हातात आहे आणि तू अंधाराला घाबरतो. गुरुजींचा असा उपदेश ऐकून शिष्य पुढं जातो त्याच्यासोबतच प्रकाश पण पुढे जातो. मग कंदील घेऊन पुढे जात राहतो आणि नदीपर्यंत पोहोचतो. पात्रातून पाणी घेऊन परत येतो. शिष्य म्हणतो, मी पात्रातून पाणी आणलं आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा गुरुजी बोलले की, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, पण तुझ्या लक्षात आलं नाही. गुरुजींनी त्याला समजावलं की, हे जग अंधकारमय आहे, यात प्रत्येक क्षण हा कंदिलाच्या उजेडाप्रमाणे आहे. जेव्हा आपण प्रत्येक क्षणाचा वापर करत पुढे जातो तेव्हा आनंदाने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहाेचतो. पण भविष्यातील अंधाराला बघून प्रयत्न न करता आपण घाबरलो तर आपण कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही.

शिकवण : नेहमीच आपण कठीण ध्येय साध्य करण्याआधीच हे आपल्याला शक्य नाही, असा विचार करतो. पण प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणारा कधीच अपयशी नाही होऊ शकत. जे प्रयत्न करतात ते कधीच हार मानत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...