आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्राचीन काळी एक सैनिक युद्धावरून घरी परत आल्यानंतर त्याची वागणूक पूर्णपणे बदललेली होती. आता तो छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागात येत होता. यामुळे घरातील तणाव वाढला होता. पत्नीला काय करावे समजत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी पत्नी शहरातील प्रसिद्ध संताकडे गेली. या संताविषयी अशी मान्यता होती की, हे पती-पत्नीमधील प्रेम कायम ठेवण्यासाठी औषध द्यायचे. महिले आपले संपूर्ण दुःख संताला सांगितले.
> संताने महिलेला सांगितले की, युद्धामधील भीषण दृश्य पाहून तुझ्या पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला आहे. आपण यावर उपचार करू परंतु यासाठी तू मला एका जीवनात वाघाचा एक केस आणून दे.
> महिला म्हणाली- हे तर अवघड काम आहे. एखाद्या वाघाचा केस मी कुठून आणू शकते.
> संत म्हणाले, याशिवाय तुझ्या पतीसाठी औषध तयार होऊ शकत नाही.
> महिलेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पतीला ठीक करायचे होते, यामुळे तिने संताची अट मान्य होईल.
> महिला जंगलात गेली. तिने लपून एका वाघाच्या गुहेबाहेर मांसचा तुकडा ठेवला. असे ती रोज करू लागली. हळू-हळू तिची भीती नष्ट होऊ लागली. एके दिवशी ती मांस घेऊन आल्यानंतर वाघ गुहेच्या बाहेरच बसला होता. तिने लांबूनच वाघाकडे मांस फेकले. वाघाने मांस खाल्ले परंतु महिलेला कोणतीही इजा केली नाही.
> त्यानंतर ती महिला दररोज वाघाला मांस खाऊ घालू लागली. काही दिवसांनी वाघ आणि महिलेमध्ये मैत्री झाल्यानंतर तिने वाघाचं एक केस तोडून घेतला.
> वाघाचा केस घेऊन ती लगेच संतांकडे आली. संत म्हणाले, जर तू वाघाला नियंत्रणात ठेवू शकतेस, त्याचा केस घेऊन येऊ शकतेस तर तू तुझ्या पतीलाही नियंत्रणात ठेवू शकते. जर तू पतीसोबत प्रेमाने वागलीस तर हळू-हळू त्याच्या स्वभावातही बदल घडू लागेल. यासाठी थोडावेळ लागेल परंतु पतीचे प्रेम तू पुन्हा जिंकू शकतेस.
> महिलेला संतांची गोष्ट लक्षात आली होती. त्यादिवसापासून ती पतीच्या क्रोधाचे उत्तर प्रेमाने देऊ लागली आणि काही दिवसांनीच पतीचे हृदय परिवर्तन झाले आणि दोघेही सुखी संसार करू लागले.
कथेची शिकवण - ही केवळ एक प्रेरक कथा आहे. या कथेचा सार असा आहे की, व्यक्तीने ठरवल्यास तो आपल्या जोडीदाराच्या क्रोधी स्वभावाला शांत करू शकतो.यासाठी धैर्य आणि प्रेमाची आवश्यकता असते. धैर्य आणि प्रेमाने प्रत्येक गोष्ट हाताळल्यास वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.