आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरक प्रसंग: पती-पत्नी भांडत होते आणि एकमेकांना ओरडून बोलत होते, हे पाहून संतांनी शिष्याला विचारले रागात लोक जोरात का बोलतात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. एक संत आपल्या शिष्यांसोबत कुठेतरी जात होते. त्यांनी रस्त्यात पाहिले की, पती-पत्नी एकमेकांसोबत भांडत होते आणि जोरजोरात बोलत होते. संतांनी हे पाहिले आणि आपल्या शिष्यांना विचारले, लोक रागात एकमेकांवर का ओरडतात?


- सर्व शिष्य विचार करत राहिले, यानंतर एकाने उत्तर दिले की, आपण रागात शांतता हरवून देतो. यामुळे आपण जोरजोरात ओरडतो. 
- यानंतर गुरु म्हणाले, पण दूसरा व्यक्ती आपल्या समोर उभा असतो, तर मग ओरडायची काय गरज आहे? आपल्याला जे सांगायचे आहे ते हळू आवाजातही बोलले जाऊ शकते. 
- अजून काही शिष्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण समाधान मिळाले नाही. 
- यानंतर संतांनी शिष्याला समजावले की, जेव्हा दोन लोक एकमेकांवर नाराज असतात, तेव्हा त्यांचे मन एकमेकांपासून खुप दूर गेलेले असतात. या अवस्थेत ते एकमेकांना जोरात बोलल्याशिवाय ऐकू शकत नाही. 
- लोक जेवढे जास्त रागात असतात, त्यांच्यामधील दुरावा तेवढा वाढतो आणि त्यांना त्याच तीव्रतेने ओरडावे लागते. 
- संत पुढे म्हणाले की, पती-पत्नी किंवा दोन लोक प्रेमात असतात, तेव्हा ते ओरडत नाही, ते हळुहळू बोलतात, कारण त्यांची मनं जवळ असतात. मनामध्ये जराही अंतर नसते. 
- संतांनी आपल्या शिष्यांना सांगितले की, पती-पत्नी जेव्हा एकमेकांवर खुप प्रेम करतात, तेव्हा ते बोलत नाही, ते एकमेकांकडे पाहूनच गोष्टी समजून घेतात. 


 

बातम्या आणखी आहेत...