आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट संगतीमुळे माणुस चुकीच्या मार्गाला जातो, तर चांगल्या ज्ञानामुळे आयुष्य सुधारते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क- एका गावात एक चोर राहात होता, त्याने आतापर्यंत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या. चोरीचे काम करता करता त्याने आपल्या मुलालाही चोरी करण्याची कला शिकवली. आता तो चोर म्हतारा झाला होता, म्हणून त्याने घर संभाळण्याची जबाबदारी आपल्या मुलाकडे दिली. यादरम्यान त्याने आपल्या मुलाला समजावून सांगितले कधीच कोणत्याही साधू-संताचे उपदेश ऐकू नको. 

 

आपल्या वडीलांचा सल्ला ऐकून मुलगा रोज चोरी करू लागला. आणि काही दिवसातच तो चोरी करण्यात पारंगत झाला. या कामामुळे दोघांचेही आयुष्य आनंदात आणि आरामात जात होते. असाच एक दिवस त्याच्या मनात विचार आला की  आपण राजमहालात चोरी करूया, म्हणजे आपल्याला भरपूर धन मिळेल. असा विचार करून तो राजमहालात गेला आणि तेथे गेल्यावर अनेक लोक एका जागेवर एकत्रित होताना दिसले. म्हणून त्याने एका व्यक्तीला विचारले तर कळाले की, आज राजमहालात एक संत प्रवचन देत आहेत.

 

त्याला आपल्या वडीलांचा सल्ला आठवला आणि तो तेथून गडबडीत निघला असता त्याला ठेस लागली आणि तो खाली पडला. त्याच्या बोटाला चांगलीच दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही वेळ जागेवरच बसून राहीला. यादरम्यान संताचे काही विचार त्याच्या कानावर पडले, संत सांगत होते की, कधीच कोणाशी खोटे बोलू नका आणि आपण ज्याचे अन्न खाल्ले आहे त्याचे कधीही वाईट करू नका.

 

या दोन गोष्टी ऐकून चोराचा मुलगा राजमहालाच्या बाहेर पडला. त्यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या एका पहारेकऱ्याने त्याला अडवले आणि विचारले की, तु कुठे जात आहेस? त्यावर तरूणाला संताचा उपदेश लक्षात आला आणि तो म्हणाला, मी एक चोर असून राजमहालात चोरी करण्यासाठी आलो आहे. पहारेदाराला वाटले की, हा राजमहालातील एखादा नोकर असून आपल्यासोबत चेष्टा करतोय. म्हणून त्याने या चोराला आतमध्ये प्रवेश दिला.
 

आतमध्ये जाताच त्याने पटापटा मौल्यवान वस्तूंची चोरी केली आणि बाहेर पडण्यासाठी निघाला. तेव्हा त्याला राजमहालातील स्वयंपाकघर दिसले. त्याला वाटले की, शाहीजेवण खूप चविष्ट असते त्यामुळे आपण जेवन करून जाऊ. तो लगेच स्वयंपाक घरात गेला आणि जेवन केले. जेवन केल्यानंतर त्याला संतानी सांगितलेली दुसरी गोष्ट लक्षात आली. त्यामुळे त्याने चोरी केलेल्या सर्व वस्तू तेथेच ठेवल्या आणि महालातून बाहेर जाऊ लागला. तितक्यात राजाच्या एक सेवकाने त्याला पाहिले, सेवकाच्या लगेच लक्षात आले की हा व्यक्ती बाहेरचा असून येते चोरी करण्यासाठी आला आहे. म्हणून त्या सेवकाने चोराला पकडून राजा समोर आणले. 

 

यावर राजाने त्याला विचारले की, तू कोण आहेस आणि चोरी करण्याचे कारण काय, राजाच्या या प्रश्नावर तो चोर खूप घाबरला आणि सर्व घडलेली गोष्ट राजाला सांगितली. राजा त्याची ही सत्य कथा ऐकून आश्चर्यचकीत झाला. पण राजाला वाटले की, हा तरूण आला तर चोरी करण्यासाठी होता. पण याचे मन निर्मळ आहे. वाईट संगत आणि वागणुकीमुळे याच्यावर ही वेळ आली. राजाला त्याचा निर्मळपणा फार आवडला आणि त्याने या चोराला माफ केले. आणि त्याला राजमहालात पहारेदार म्हणून कामावर ठेवले.

 

कथेची शिकवन

आपण कधीच वाईट संगतीत राहू नये. वाईट संगतीमुळे आपण चुकीचे काम करतो. आपल्याला ज्याठिकाणी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील त्या नक्की ऐका. ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आयुष्यात आपल्याला यशस्वी बनवते.