आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी कथा / मनामध्ये एखादे चांगले काम करण्याचा विचार आल्यानंतर ते काम लगेच करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क- प्राचीन काळातील ही कथा. एका गावात एक संत राहायचे. एक दिवस मध्यरात्री कोणी तरी त्यांचे दार वाजवले. दार उघडले तर त्यांचा एक शिष्य बाहेर ऊभा होता आणि त्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती. हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले. शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की, गुरूजी मला हे धन आताच दान करायचे आहे. यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतो, एवढ्या रात्री येथे येण्याची काय गरज होती. त्यावर शिष्य म्हणाला की, गुरूजी आपनच सांगता, चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे, नंतर आपले मन बदलू शकते. त्यामुळे मी विचार केला की, जर मी आताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो. म्हणून मी धन घेऊन आपल्याकडे आलोय.

 

शिष्याचे विचार ऐकून संताने त्याला अलिंगन दिले आणि म्हटले की, जर प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचा आयुष्यात स्विकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही. त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही.

 

कथेची शिकवन
या छोट्याशा कथेची शिकवन ऐवढीच की, आपल्या मनात चांगले, वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात. त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच ते काम करा. कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते.