आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्याची चिंता सोडून आपला आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क- एका महानगरात राहणाऱ्या शेठजीची ही कथा आहे. शेठजी खूप धन संपन्न होते. त्यांचे आयुष्य चांगले सुरळीत सुरू होते, कोणत्याही गोष्टीची करमतरता नव्हती. असाच एक दिवस शेठजीच्या मनात विचार आला की, आपण आपल्या मालमत्तेच मुल्यांकन करावे. सर्व मालमत्ता मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्याकडे असलेल्या या संपत्तीमध्ये आपल्या सात पिढ्या आरामात जगू शकतात. मनातील ही गालबेल सुरू असताना एका क्षणाला त्यांना आनंद वाटला पण दुसऱ्याच क्षणाला वाटले की, माझ्या सात पिढ्या तर आरामात जगतील पण आठव्या पिढीचे काय? त्यांना कसे सुख मिळणार? या विचाराने शेठजी स्तब्ध झाले.

 

आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शेठजी नगरातील एका विद्वान संताकडे गेले. शेठजी संताना प्रणाम करून म्हणाले की, गुरूजी माझ्याकडे तर फक्त सात पिढ्यांना पुरेल एवढेच धन आहे आणि मला माझ्या आठव्या पिढीची खूप चिंता लागली आहे. माझी आठवी पिढीसुद्धा सुखी राहील यासाठी काही तरी उपाय सांगा. 

 

त्यावर साधूने सांगितले की, आपल्या नगरात एक म्हातारी राहते, तिच्या घरात काम करणारा कोणीच नाही. दररोजचे जेवण तिला व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे आपण एक काम करा, त्या म्हातारीला अर्धा किलो पिठ दान करा. या छोट्याशा मदतीने आपली समस्या दूर होईल. गुरूजीच्या उत्तरामुळे शेठजीला आश्चर्य वाटले पण थोडा विचार करून ते लगेच आपल्या घरी गेले. 

 

शेठजीने एक पिठाचे पोते घेऊन म्हातारीच्या घरी गेले आणि म्हणाले मी तुमच्यासाठी एक पोते पिठ आणले आहे, कृपया त्याचा स्विकार करा. म्हातारी ते पोते घेण्यास नकार दिला आणि म्हणाली माझ्याकडे आजच्या पुरते पीठ आहे, त्यामुळे मला याची गरज नाही. त्यावर शेठजी म्हणाले की, हे पीठ तुमच्याकडे ठेवा त्यामुळे आपल्याला अनेक दिवस चिंता करण्याची गरज नाही. तेव्हा म्हातारी म्हणाली मी उद्या काय होईल याची काळजी कधीच करत नाही, माझ्याकडे आज अन्न आहे त्यातच मी खूश आहे. जसे आज जेवन मिळाले तसे उद्याही मिळेल.

 

म्हातारीचे बोलने व्यापाऱ्याला समजले की, या महिलेकडे जेवनाची व्यवस्था नसून ती कशाची काळजी करत नाही. माझ्याकडे तर अपार धन-संपत्ती आहे, तर मी कारण नसताना भविष्याचा विचार काय करू. साधूच्या युक्तीमुळे शेठजीला समाधान मिळाले आणि त्यांनी आपल्या चिंतेचा त्याग केला.


कथेची शिकवण
आपण भविष्यात काय होईल याची काळजी न करता आपला आजचा दिवस वाया घालू नये. अनेक लोक भविष्यासाठी संपत्ती साठवतात. पण वर्तमान स्थितीची चिंता करतात. त्यामुळे आपण आजचा दिवस आनंदाने जगला पाहिजे.