Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | motivational story, inspirational story, prerak katha, story about success

आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि जातात, पण नेहमी सकारात्मक विचार ठेऊन काम करा

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 09, 2019, 06:02 PM IST

संतांनी दुःखी व्यक्तीला सांगितले की, रात्रभर गायींची सेवा कर, तेव्हा सुखाचा मार्ग सांगेन

 • motivational story, inspirational story, prerak katha, story about success

  जीवनमंत्र डेस्क- एका गावातील व्यक्ती नेहमी दुःखी राहत असे. आपले घर आणि कुटुंबासोबतही तो असाच वागू लागला. त्याच्या या अशा व्यवहारामुळे समाजात त्याला मान मिळत नसे. त्यामुळे तो खूप हताश झाला होता. एक दिवस गावात एक विद्वान साधूचे आल्याचे दुःखी तरूणाला कळाले. तो लगेच साधूकडे गेला. तिथे सर्व लोकं आपापली समस्या साधूला सांगत होते. तो दुःखी तरूण बाजूला राहूनच हे सर्व पाहत होता. सर्वांचे दर्शन झाल्यानंतर तरूणाने गुरूजींचे दर्शन घेतले आणि म्हणाला गुरूजी मी खुप दुःखी आहे. मला या त्रासातून बाहेर काढा. काहीतरी असा मार्ग सांगा की, माझ्या सर्व समस्या दुर होतील.

  दुःखी तरूणाचे बोलणे ऐकून साधू म्हणाले मी तूला सर्व दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग सांगेन, पण त्यासाठी तुला माझे एक काम करावे लागेल. त्या व्यक्तीने लगेच होकार दिला. साधू म्हणाले तूला आज रात्री माझ्या गौशाळेत येऊन गायींची सेवा करावी लागेल. जेव्हा सर्व गायी झोपतील, तेव्हा तु आराम कर. दुःखी माणसाने त्यांच्या आज्ञेचा स्विकार केला आणि रात्री गायींची देखरेख करण्यासाठी आश्रमात गेला. रात्रभर त्याने गायींवर लक्ष ठेवले. सकाळ झाल्यानंतर तो गुरूजींना भेटायला गेला. तेव्हा गुरूजीने विचारले की तूला झोप लागली का?

  त्यावर व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मला तर रात्रभर झोप लागलीच नाही. कारण सर्व गायीं एकत्र झोपत नाही. एक गाय झोपली तर दुसरी गाय उठते, रात्रभर असे चालत राहिले. तेव्हा गुरूजी स्मित हास्य करून म्हणाले, आपल्या आयुष्यातील अडचणीसुद्धा या गायींसारख्याच आहेत. कधीच सर्व समस्या एकत्र येत नाही किंवा जात नाहीत. आयुष्याचे हे चक्र असेच फिरत असते. त्यामुळे आपण अडचणींचा सामना करायला पाहिजे. तसेच, येणाऱ्या अडथळ्यांना न घाबरता, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचारांना बळी पडू नये.

  कथेची शिकवण
  आपण अडचणींना न घाबरता त्यांचा धाडसाने सामना करायला पाहिजे. आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि जातात. म्हणून सकारात्मक विचार करूण पुढे जाणे आवश्यक आहे.

Trending