आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक राजकुमारी आपल्या आयुष्यावर आनंदी नव्हती, ती जीव देण्यासाठी जात होती, तेव्हा तिला एक वृध्द गृहस्थ भेटले, त्यांची पत्नी आणि मुलांचे निधन झालेले होते, पण तरीही ते आनंदी होते, राजकुमारीने त्यांना विचारले आनंदाचे रहस्य?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. प्राचिन काळात एक राजकुमारी होती, तिच्याजवळ सर्व सुख-सुविधा होत्या, प्रत्येक वस्तू होती, शेकडो सेवका तिच्या सेवेत प्रत्येक क्षणाला हजर राहायच्या. पण राजकुमारी आपल्या या आयुष्यावर अजिबात आनंदी नव्हती, ती नेहमी दुःखी राहायची. आनंद

मिळवण्यासाठी काय करायला हवे हे तिला कळत नव्हते. 


- एक दिवस तिने विचार केला की, आयुष्य काहीच कामाचे नाही, आपण मुक्ती मिळवायला हवी. यामुळे ती मरण्यासाठी पर्वतावर जात होती. रस्त्यात तिला एक वृध्द गृहस्थ कुत्र्यांना खाऊ घालताना आणि त्यांची काळजी घेताना दिसले. 
- ते वृध्द खुप आनंदी दिसत होते, त्यांच्या आयुष्यात काहीच कमतरता नाही असे ते वाटत होते. राजकुमारीने वृध्द व्यक्तीला आपला परिचय दिला आणि विचारले की, तुम्ही एवढे आनंदी आहात, याचे कारण काय आहे?
- वृध्द म्हणाले, राजकुमारीजी काही दिवसांपुर्वी मी खुप निराश होतो आणि आपले जीवन संपवावे वाटत होते. कारण माझी पत्नी आणि मुलं एका अपघातात मरण पावले आहेत. एकटे जीवन जगणे खुप कठीण असते. एक दिवस मी माझे आयुष्य संपवण्यासाठी जात होतो. तेव्हा रस्त्यात एक छोटे कुत्र्याचे पिल्लूही माझ्या मागे आले. मी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळतच माझ्या घरी गेलो, ते पिल्लू तिथेही माझ्या मागे आले. मग मी दार बंद करुन घेतले. थोडावेळानंतर मी पाहिले तर थंडीमुळे ते पिल्लू थरथरत होते. मला त्याच्यावर दया आली. मी त्याला चादरीमध्ये गुंडाळले आणि पिण्यासाठी दूध दिले. थोड्या वेळातच ते पिल्लू बरे झाले. हे पाहून मला खुप आनंद मिळाला. 
- त्या दिवसापासून मला कळाले की, जर मी दुःखी असेल, तर मी कमीत कमी दूस-यांचे दुःख तर दूर करु शकतो. तेव्हापासून मी मुक्या कुत्र्यांची सेवा करणे सुरु केले आणि जीवनात मी खुप आनंदी आहे. 
- आता राजकुमारीलाही जाणिव झाली की, तिने दुस-यांसाठी चांगले काम करायला हवे. यामुळे खरा आनंद मिळतो. हा विचार करत ती महालात आली आणि त्या दिवसापासून तिने गरीबांची सेवा करणे सुरु केले. 


कथेचे तात्पर्य 
जर आपण स्वतःच्या आयुष्यात आनंदी नसू किंवा निराश असू तर आपण हे जीवन दूस-यांच्या सुखासाठी अर्पित करायला हवे. असे केल्याने दूस-यांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. 
 


 

बातम्या आणखी आहेत...