आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरस्तु यांच्या 10 गोष्टी बदलू शकतात तुमचे विचार, यामुळे दूर होऊ शकतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनानचे विश्वप्रसिद्ध तत्त्वज्ञ अरस्तु यांचा जन्म 384 ई.पू. स्टेगेरिया नामक शहरात झाला होता. अरस्तु यांनी भौतिक विज्ञान, अध्यात्म, कविता, नाटक, संगीत, राजकारण, नीतिशास्त्र इ. विषयांवर विविध ग्रंथ लिहिले आहेत. सम्राट सिकंदरही अरस्तु यांचे शिष्य होते. अरस्तु यांनी जीवनात यश आणि सुख प्राप्तीसाठी विविध नीती सांगितल्या आहेत. येथे जाणून घ्या, अरस्तु यांच्या 10 अशा गोष्टी, ज्या आपल्या अडचणी दूर करू शकतात...


1. कोणीही भित्रे आणि अविवेकी राहू नये, याउलट प्रत्येकाने धाडसी असावे. आपण धाडसी काम केल्यानंतरच पराक्रमी बनू शकतो.


2. जर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये आनंदी असाल तरच तुमचे कामामध्ये कौशल्य वाढत राहील.


3. आपली धन-संपत्ती नाही तर आपला स्वभावच आपल्याला विश्वसनीय बनवतो, 


4. ज्याला व्यक्ती घाबरतो त्याच्याशी कधीही प्रेम करू शकत नाही.


5. आपल्या चांगल्या चारित्र्यामुळे आपण इतरांकडून आपले काम करवून घेऊ शकतो. चांगल्या लोकांच्या गोष्टी सर्वजण मान्य करतात.


6. पुन्हा चांगली सुरुवात करण्याऐवजी अपूर्ण काम पूर्ण करा.


7. काहीही शिकणे हा लहान मुलांचा खेळ नाही. आपण त्रासाशिवाय काहीच शिकू शकत नाहीत.


8. मित्र बनवणे घाईचे काम आहे परंतु मैत्री हळू-हळू पिकणारे फळ आहे.


9. आपले जीवन तेव्हाच सार्थक आहे जेव्हा आपण सर्व लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते प्राप्त करतो.


10. तुम्हाला लिहिण्याची इच्छा असेल तर एक सामान्य व्यक्तीप्रमाणे राहावे परंतु एक बुद्धिमान व्यक्तीप्रमाणे विचार करावा.

बातम्या आणखी आहेत...