Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Motivational story of Gautam buddha truth about death and life

मृत्यूनंतर काय होते? आत्मासोबत काय घडते?, गौतम बुद्धांच्या शिष्याने त्यांना विचारला हा विचित्र प्रश्न, याबदल्यात बुद्धांनी देखील विचारला एक प्रश्न आणि त्याला समजावून सांगितले जीवन-मृत्युचे महत्व

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 03:05 PM IST

आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत विचार करण्यात काही अर्थ नाही

 • Motivational story of Gautam buddha truth about death and life

  रिलिजन डेस्क - जीवन आणि जीवनाविषयी जोडलेल्या विषयांबाबत गौतम बुद्ध यांचा दृष्टीकोन एकदम योग्य आणि सहज लक्षात येण्यासारखाच राहिला आहे. त्यांनी कधीच कोणत्या विषयाला अधिक उलगडून समजावले नाही. आपल्या शिष्यांची विषयांबाबतची जिज्ञासा ते साधारण उदारहण देऊन सोडवत होते.

  एकेदिवशी बुद्धला त्यांच्या शिष्याने विचारले की, गुरूजी मृत्यूनंतर काय होते हे तुम्ही आजतागायत आम्हाला सांगितले नाही. शिष्याचे बोलणे ऐकून बुद्ध हसले, यानतर त्यांनी त्याला विचारले की, आधी माझ्या एक प्रश्नाचे उत्तर दे. कोणी जर कुठे जात असेल आणि अचानक एक विषारी बाण त्याला लागत असेल तर त्याने काय करावे. शरीरातील बाणाला काढणे उचित राहिल की, बाण कोठून आला आणि कोणासाठी मारला होता याचा शोध घ्यावा?


  शिष्य म्हणाला, शरीरातील बाणाला तत्काळ काढायला हवे, अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल. बुद्ध म्हणाले, अगदी बरोबर सांगितले तू. आता मला सांग की या जीवनातील दुःखांचे निवारण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात की, मृत्यूनंतर होणाऱ्या गोष्टींबाबत विचार करावा. जे आपल्या हातात नाही त्या गोष्टींचा विचार का करावा? कोणाचा मृत्यू कधी येणार हे फक्त ईश्वरालाच माहीत असते. मनुष्याचा हातात फक्त कर्म करणे असते. आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत विचार करून वेळ वाया घालवू नये. फक्त आपण करू शकणाऱ्या गोष्टींबाबत विचार करावा. शिष्याला बुद्धांचे म्हणणे समजले होते आणि त्याची मृत्यूनंतर काय होते याबाबतची जिज्ञासा देखील शांत झाली.

  गोष्टीची शिकवण
  मनुष्याने आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत जास्त विचार करू नये. मनुष्याने आपल्या अडचणी कमी होतील. समाजाला फायदा होईल किंवा इतर मनुष्याची मदत होईल अशाच गोष्टींबाबत विचार करायला हवा.

Trending