आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या जीवनात कधीकधी समस्या छोटी असते परंतु आपण विचारांनी ती मोठी बनवतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक राजाने सुंदर महाल बांधून घेतला आणि मुख्य दारावर गणिताचे एक सूत्र लिहून घेतले. राजाने आपल्या राज्यात घोषणा केली की, या सूत्राचे उत्तर मिळताच हा दरवाजा उघडला जाईल आणि जो व्यक्ती उत्तर देईल त्याला मी माझा उत्तराधिकारी नियुक्त करेल.


> ही घोषणा वाऱ्यासारखी राज्यात पसरली आणि सर्व लोक राजमहालाच्या दारात पोहोचून गणिताचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले. कोणालाही त्या गणिताचे सूत्र लक्षात येत नव्हते. हळू-हळू ही गोष्ट इतर राज्यांपर्यंत पोहोचली आणि मोठमोठे विद्वान गणितज्ञ सूत्र सोडवण्यासाठी पोहोचले.


> काही गणित विद्वानांनी तर आपल्यासोबत गणिताची पुस्तकेही आणली परंतु त्या गणिताचे उत्तर कोणालाही सांगता आले नाही.


> तेथे उभा असलेला एक गरीब मुलगा हे सर्वकाही पाहात होता. त्यानेही गणिताचे उत्तर शोधावे असा विचार केला.


> सैनिकांना त्याने आपली गणित सोडवण्याची इच्छा सांगितली. सैनिक म्हणाले येथे मोठे मोठे गणित विद्वान अपयशी ठरले आहेत, तू ही प्रयत्न करून बघ.


> तो मुलगा थोडावेळ ध्यान लावून बसला आणि डोळे उघडून दरवाजाकडे चालू लागला. त्याने दरवाजाला हात लावताच दरवाजा उघडला. हे पाहून सर्वजण चकित झाले.


> राजाने मुलाला तू हे कसे काय केले असा प्रश्न विचारला.


> मुलगा म्हणाला की, मी ध्यान लावून बसल्यानंतर माझ्या अंतर्मनातून आवाज आला की, पहिले हे गणिताचे सूत्र आहे की नाही हे तपासून घ्यावे. त्यानंतर हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करावा. मी माझ्या मनाचे ऐकले. सूत्रासोबत दरवाजाचा संबंध जाणून घेण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडला. यावरून हे सिद्ध होते की, दरवाजा आणि सूत्राचा काहीही संबंध नाही. हे गणित सूत्र नव्हतेच त्यामुळे हे सोडवण्याचीही गरज नव्हती. ही तर एक छोटीशी समस्या होती परंतु सर्वांनी आपल्या विचारांनी ही एक मोठी आणि अवघड समस्या बनवून घेतली. राजा मुलाच्या हुशारीवर प्रसन्न झाला आणि त्याला आपला उत्तराधिकारी बनवले.


कथेची शिकवण 
आपल्या जीवनात कधीकधी समस्या छोटी असते परंतु आपण विचारांनी ती समस्या मोठी बनवतो. राजाने मुख्य दारावर चुकीचे सूत्र लिहिले होते आणि सर्वजण हे मोठे आव्हान मानू लागले आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. कोणीही सूत्राचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या भावी उत्तराधिकाऱ्याची तार्किक बुद्धी पारखण्यासाठी राजाने ही अट ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...