आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींचा सामना करूनच व्यक्ती मोठे यश संपादन करू शकतो, समस्यांना घाबरणाऱ्यांची कधीच प्रगती होत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका राजदरबारात एक कवी होते. राजा त्यांचा खूप आदर करत असे. एक दिवस राजा दरबारात बसलेला होता, तेव्हा राजकवी दरबारात आले, राजाने त्यांना अभिवादन केले असता त्यांनी राजाला आशीर्वाद दिला की आपला शत्रू चिरंजीव होवो. हे ऐकून राजा आणि संपुर्ण दरबार आश्चर्यचकित झाला. कवीच्या अशा वागण्याचा राजाला राग आला पण त्याने आपला क्रोध शांत केला. दरबारातील काही मंत्री कवीराजवर नेहमी जळत होते. त्यांना वाटले की आता राजा या कवीला दरबारातून बाहेर काढून टाकेल.


राजकवीला ही गोष्ट लगेच लक्षात आली आणि ते राजाला म्हणाले महाराज मला क्षमा करा, मी तूम्हाला काहीतरी दिले आहे पण आपण त्याचा स्विकार केला नाही. राजाला हे ऐकुन आश्चर्य वाटले आणि तो कवींना म्हणाले आपण काय दिले आहे. कवी म्हणाले महाराज मी आपल्याला आशीर्वाद दिला आहे. पण तुम्ही त्याचा स्विकार केला नाही. राजा म्हणाला मी असा आशिर्वाद कसा घेऊ शकतो, तुम्ही तर माझ्या शत्रूला आशिर्वाद दिला. राजकवीने राजाला समजावुन सांगितले की महाराज माझ्या आशिर्वादाने आपले नेहमी भलेच होईल. तुमचे शत्रू जिवंत राहिले तर आपल्यात बळ, बुद्धि, पराक्रम आणि सावधानी कायम राहील. शत्रूंचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असाल. जोपर्यंत शत्रूची भिती राहील आपण जागृत राहणार. शत्रूच्या अभावात आपण बेसावध राहिलात तर एखाद्या दिवशी याचा फायदा घेऊन दुसरा राजा आपल्या राज्यावर आक्रमण करील. म्हणून माझ्या आशिर्वादात या राज्याचे हित आहे.  राजाला राजकवीचा सल्ला समजला आणि संतुष्ट झाला. राजाने स्वखुशीने राजकवीचा आशिर्वाद स्विकार केला.


कथेची शिकवण
जर आपल्या आयुष्यात समस्या आल्या तर आपण त्यांचा सामना करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढतो. अडचणींना तोंड देऊनच व्यक्ती मोठे यश संपादन करू शकतो. समस्यांना घाबरणारे लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाही. अडचणीमुळे व्यक्तीची योग्यता पारखता येते. जसे सोने आगीत तापून निखळते तसेच मनुष्य अडचणींचा सामना करून अधिक योग्य होत असतो.

बातम्या आणखी आहेत...