आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण आपले विचार नेहमी मोठे ठेवायला हवे, शिंप्याच्या उजळलेल्या भाग्यामुळे सर्वांनाच पटेल ही गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. प्राचिन काही एक राजा आपल्या प्रजेची स्थिती पाहण्यासाठी आपले राज्य फिरायला निघाला. राजासोबत मंत्रीही होता. दोघंही वेश बदलून राज्यात फिरत होते. तेव्चा एका काटेरी झाडांमुळे राजाचा कुर्ता फाटला . 


- राजा मंत्र्याला एखाद्या शिंपीला शोधायला सांगितले. मंत्रीने लवकरच एक शिंपी शोधला आणि त्याला सांगितले की, राजा प्रजेची स्थिती पाहण्यासाठी निघाले आहेत आणि त्यांचा कुर्ता फाटला. तु लवकर तो शिवून दे. 
- शिंपी सुई-दोरा घेऊन राजाजवळ पोहोचला आणि खुप चांगल्याप्रकारे राजाचा कुर्ता शिवून दिला. राजा शिंप्याच्या कामामुळे खुप आनंदी झाला, कारण कुर्त्यामधील फाटलेला भाग आता दिसत नव्हता. 
- राजा शिंप्याला म्हणाला की, तुला काय हवे ते माग. शिंप्याने विचार केला की, मी राजाला काय मागू, माला तर थोडाच दोरा लागला. 2 मुद्रा मागतो.
- मग त्याने पुन्हा विचार केला की, जर राजाने विचार केला की, मी जास्त मुद्रा मागितल्या तर राजा मला शिक्षमा देतील. 
- तो राजाला म्हणाला की, थोडेसेच काम होते, याचे मी पैसे कसे घेऊ, तुम्ही राहू द्या. 
- राजा पुन्हा म्हणाला की, तु काम केले आहे, तर तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळायलाच हवे. माग हाय हवे ते.
- शिंपी म्हणाला की, महाराज काम खुप थोडे होते, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही मला द्या. 
- राजा म्हणाला की, शिंप्याने मला अडचणीत टाकले आहे. मला माझ्या हिशोबानेच काही तरी द्यावे लागेल. 
- राजा मंत्र्याला म्हणाला की, शिंप्याला 2 गाव देऊन टाका. हे ऐकून शिंपी चकीत झाला. त्याने फक्त 2 मुद्रा मागण्याचा विचार केला होता, पण राजाने 2 गावं दिले. 

कथेचे तात्पर्य : आपण आपले विचार मोठे ठेवायला हवे. कधी-कधी नकळत आपण कमी विचार करतो, यामुळे आपल्याला पुर्ण फळ मिळू शकत नाही. जर शिंप्याने फक्त 2 मुद्रा मागितल्या असत्या तर राजाने त्याला 2 गावं दिली नसती. 

बातम्या आणखी आहेत...