आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजाला कसे समजले की कोणताच प्राणी निरुपयोगी नाही, माशा आणि कोळीही आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजाला कसे समजले की कोणताच प्राणी निरुपयोगी नाही, माशा आणि कोळीही आवश्यक
प्राचीन काळी एका राजाने आपल्या मंत्र्यांना राज्यातील कोणकोणते जीव-जंतू उपयोगी नाहीत याचा शोध घेण्याचाआदेश दिला.


> मंत्र्यांनी खूप दिवस याचा शोध घेतला आणि राजाला सांगितले की, जंगलातील माशा आणि जाळे विणणारे कोळी किडे एकदम निरूपयोगी आहेत. यांचा काहीच उपयोग नाही. राजाने जंगलातील सर्व माशा आणि कोळी नष्ट करण्याचा विचार केला.


> त्याचवेळी शत्रूंनी राजाच्या राज्यावर आक्रमण केले. अचानक झालेल्या आक्रमणामुळे राजाचा पराभव झाला आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात लपून बसला. राजाच्या शोधात शत्रू सैनिकही जंगलात आले.


> चालून-चालून राजा थकून गेला आणि एका झाडाखाली बसला. थकव्यामुळे त्याला लगेच झोप लागली.


> काही वेळाने एका जंगली माशीने राजाच्या नाकावर डंक मारला आणि यामुळे राजाची झोपमोड झाली. राजाने विचार केला की असे झोपणे सुरक्षित नाही आणि यामुळे तो एका गुहेत गेला.


> गुहेमध्ये गेल्यानंतर काही वेळाने कोळी किड्यांची गुहेच्या दरवाजावर मोठे जाळे विणले.


> शत्रू सैनिक राजाला शोधत-शोधत गुहेपर्यंत आले. गुहेच्या सुरुवातीलाच कोळ्याचे जाळे पाहून त्यांनी विचार केला की राजा गुहेत गेला असेल तर हे जाळे नष्ट झाले असते. असा विचार करून ते सैनिक तेथून निघून गेले.


> राजा या सगळ्या गोष्टी ऐकत होता आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याच्या लक्षात आले की, निसर्गातील प्रत्येक जीव आवश्यक असून कोणीही निरुपयोगी नाही. माशी आणि कोळी किड्याने त्याची मदत केली नसती तर त्याचा मृत्यू झाला असता.

बातम्या आणखी आहेत...