एका शेठने पेंटरला आपली नाव पेंट करण्यासाठी दिली, त्याने एका दिवसात नाव पेंट करून दिली, दुसऱ्या दिवशी शेठने त्याला भरपूर पैसे दिले, पेंटर म्हणाला-माझ्या कामापेक्षा हे पैसे खूप जास्त आहेत, शेठ म्हणाला माझ्या नावेत एक छिद्र होते...

मला माहीत होते नावेत छिद्र आहे आणि मुले ती नाव घेऊन गेली आहेत. त्या छिद्रामळे नाव बुडाली असती.

दिव्य मराठी

Apr 12,2019 02:36:00 PM IST

रिलीजन डेस्क- एका नदी किनारी एक शेठजी राहत होते. त्यांच्या जवळ एक नाव होती. एके दिवशी शेठजीच्या मनात विचार आला की त्यांची नाव खूप खराब झाली आहे, या नावाची रंगरंगोटी करायला पाहिजे. हा विचार करुन शेठजीने नाव एका पेंटरकडे दिली आणि नवीन रंग द्यायला सांगितला.

संध्याकाळपर्यंत पेंटरने नावेला रंग दिला आणि आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी शेठजी पेंटरच्या घरी गेले आणि त्याला भरपुर पैसे दिले. एवढे पैसे पाहुन पेंटर चकित झाला, तो शेठजीला म्हणाला हे पैसे माझ्या कामापेक्षा खूप जास्त आहे, मी एवढे पैसे नाही घेऊ शकत.

त्यावर शेठजी पेंटरला म्हणाले-''माझ्या नावेत एक छोटे छिद्र होते, जेव्हा मी तुला नाव पेंट करायला दिली होती तेव्हा हे सांगायला विसरलो होतो. मी तुला नाव देऊन गावातून बाहेर गेलो. संध्याकाळी परत आलो तेव्हा कळाले की, माझी मुले नाव घेउन नदीमध्ये सैर सपाटा करायला गेली आहेत. हे ऐकुन मी खूप घाबरलो, कारण मला माहीत होते नावेत छिद्र आहे आणि मुले ती नाव घेऊन गेली आहेत. त्या छिद्रामळे नाव बुडाली असती.

मी लगेच नदीकडे धाव घेतली, पण मला दिसले की, माझी मुले सुखरूप परतली होती. मी नावेमध्ये ते छिद्र पाहीले असता मला ते दिसले नाही, मला समजले की तु पेंट करते वेळी ते छिद्र बंद केले होते. जर तु छिद्र बंद केले नसते तर माझी मुले संकटात सापडली असती. म्हणुन मी तुला एवढे पैसे देत आहे. पेंटर शेठजीला म्हणाला- त्यात काय इतकं, हे पण माझ्या कामाचा एक भाग आहे. त्यासाठी मला अधिक कष्ट नाही करावे लागले.


कथेची शिकवन-
आपल्याला जर कोणाचे चांगले करायची संधी मिळाली तर आपण नक्की करायला पाहीजे. मदत छोटी असो व मोठी संधी मिळाल्यावर नक्की करावे. कधी-कधी या छोट्या मदतीमुळे देव खूप मोठे फळ देतो. आपले छोटेसे काम एखाद्यासाठी खुप मौल्यवान असु शकते.

X