गावात होती सापाची दहशत, तिथे आले संत, मंत्र उच्चारताच झाला चमत्कार, गावातील लोकांनी मारला दगड, नंतर झाले असे काही


आत्मरक्षणासाठी वाईट लोकांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे, पण त्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये.
 

दिव्य मराठी वेब टीम

Apr 17,2019 03:41:00 PM IST

रिलीजन डेस्क- एका चर्चित पौरानिक कथेनूसार एका गावात खूप भंयकर साप राहत होता. साप गावाच्या बाहेर असायचा पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना डसायचा. यामुळे गावातील लोक त्या रस्त्यावरून जायला घाबरायचे. एक दिवस त्या गावात प्रसिध्द आणि विद्वान संत आले. संतांना काही दिवस त्या गावात राहून दुसऱ्या गावात जायचे होते. संतांना त्याच रस्त्याने जायचे होते ज्या रस्त्यामध्ये सापाची दहशत होती. गावातील लोकांनी संतांना त्या रस्त्याने जाऊ नका असे सांगितले, कारण तो साप खुप भयानक आहे. त्यावर संत म्हणाले मला सापाची भीती नाही, मला एक मंत्र माहित आहे. त्यामुळे तो साप मला चावणार नाही.

एवढे बोलून संत त्या मार्गाने पुढे निघाले. आणि अचानक तो साप संतांसमोर आला आणि संतांना डसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा संतांनी एका मंत्राचा जप केला. आणि काय आश्चर्य मंत्र उच्चारल्यानंतर लगेच तो भयानक साप संतांना शरण आला, पण चावला नाही. गुरूजी सापाला म्हणाले की तू आता कोणालाही चावणार नाही, ईश्वराच्या भक्तीने तूझे कल्याण होईल. त्या दिवसानंतर त्या सापाने लोकांना डसने आणि घाबरवणे सोडून दिले. जेव्हा गावातील लोकांना कळले की तो साप आता शांत झाला आहे, तेव्हा ही सगळी लोकं त्या सापाला त्रास देऊ लागले. येता जाता सापाला दगड मारू लागले. एक दिवस गावातील व्यक्तीने सापाची शेपटी पकडून सापाला ऊचलले आणि जोरात जमिनीवर आदळले. गंभीर जखमी झाल्यामुळे साप बेशुध्द पडला. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर काही वेळाने तो साप शुध्दीवर आला आणि चुपचाप आपल्या बिळात जाऊन बसला. त्यानंतर सापाने बिळातून बाहेर निघने बंद केले. हळू-हळू साप खूप अशक्त होऊ लागला.


काही दिवसांनी ते संत पुन्हा त्या गावात परत आल्यानंतर त्यांना कळाले की गावातील लोकांनी त्या सापाला कशी वागणूक दिली. ते संत सापाचा शोध घेत त्या बिळाजवळ गेले आणि त्यांनी सापाला आवाज दिला. संतांचा आवाज ऐकुन साप बिळाच्या बाहेर आला. संत सापाला म्हणाले मी तुला कोणालाही डसायचे नाही असे सांगितले होते. पण स्वतच्या रक्षणासाठी तू फुस्कारू शकतो. तू लोकांना घाबरू शकतो.
त्यामुळे वाईट लोक तूला त्रास देणार नाहीत. फक्त कोणालाही डसायचे नाही एवढेच. सापाला संताचे म्हणने पटले. त्यानंतर सापाचा व्यवहार बदलला. आता तो त्या लोकांना घाबरवतो जे लोक त्याला त्रास देत होते.

कथेची शिकवन
जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आपल्याला सुध्दा आत्मरक्षण करण्याचा अधिकार आहे. आत्मरक्षणासाठी वाईट लोकांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे. आपण फक्त एवढेच लक्ष ठेवले पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये.

X
COMMENT