आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यूनानमध्ये सुकरात नावाचे एक संत खूप प्रसिद्ध होते. ते जगभरात लोकप्रिय होते आणि सर्वजण त्यांना मान-सन्मान द्यायचे. सुकरात यांना आपल्या लोकप्रियतेचा थोडासाही अहंकार नव्हता. ते अत्यंत शांत, सरळ, सहनशील आणि विनम्र स्वभावाचे होते परंतु शांत स्वभाव असलेल्या सुकरात यांची पत्नी खूप रागीट स्वभावाची होती. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद करायची परंतु सुकरात शांत राहायचे. ते आपल्या पत्नीच्या टोमण्यांचे कोणतेही उत्तर देत नव्हते आणि पत्नीचा दुर्व्यव्हार अति झाला तरी काहीच बोलत नव्हते.
> एके दिवशी सुकरात आपल्या शिष्यांसोबत घराबाहेर बसलेले होते. एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु होती. सुकरात बोलत होते आणि सर्व शिष्य त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मन लावून ऐकत होते.
> तेवढ्यात घरातून त्यांच्या पत्नीने एका कामासाठी त्यांना आवाज दिला, परंतु सुकरात हे चर्चेत एवढे मग्न झाले होते की त्यांचे पत्नीच्या आवाजाकडे लक्ष गेले नाही.
> सुकरात यांच्या पत्नीने अनेकदा आवाज दिले परंतु चर्चेत मग्न असल्यामुळे त्यांना पत्नीचा आवाज ऐकूच आला नाही.
> आता मात्र पत्नीचा राग अनावर झाला होता. पत्नीने शिष्यांसमोरच एक घागरभर पाणी सुकरात यांच्यावर टाकले. हे पाहून शिष्यांना खूप वाईट वाटले. सुकारात यांना शिष्यांची भावना लक्षात आली आणि ते शांत स्वरात म्हणाले, 'पाहा माझी पत्नी किती उदार आहे, जिने या भीषण उकाड्यात माझ्यावर पाणी टाकून मला शीतलता देण्याची कृपा केली.'
> आपल्या गुरूंची सहनशीलता पाहून शिष्यांनी आदराने गुरूला नमस्कार केला आणि पत्नीचा क्रोधही शांत झाला.
> पत्नीच्या रागाचे उत्तर साधेपणाने दिल्याने तिचा क्रोध शांत होतो आणि मोठ्या वादाची स्थिती निर्माण होत नाही. घरात शांती ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
कथेची शिकवण
अनेकवेळा पती किंवा पत्नीचा क्रोध मोठ्या वादाला जन्म देतो. क्रोध नेहमीच नुकसानदायक ठरतो आणि या स्थितीमध्ये व्यक्तीला चांगले-वाईट यामधील फरक लक्षात येत नाही. एक व्यक्ती रागात असेल तर समोरच्या व्यक्तीने शांत राहून परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करावा. दोघेही क्रोधीत झाल्यास वाद आणखी विकोपाला जातो. यामुळे दोघांनीही एकाच वेळी क्रोध करू नये.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.