संपुर्ण विश्वात आईच महान का? विवेकानंदांनी सांगितले आईचे महत्व

 या जगात आईपेक्षा जास्त सहनशील कोनीच नाही

दिव्य मराठी

Apr 15,2019 04:19:00 PM IST

रिलीजन डेस्क- स्वामी विवेकानंद यांचे अनेक असे प्रसंग प्रचलित आहेत, ज्यामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सुत्र दडलेले आहे. जर ही सुत्रे आपण जीवनात अंगीकारली तर आपण अनेक अडचणींना दुर ठेवू शकतो. एका चर्चित प्रसंगानूसार स्वामी विवेकानंदांना एका व्यक्तीने विचारले की स्वामीजी, या संपुर्ण विश्वात आईलाच सगळ्यात जास्त महत्व का दिले जाते. स्वामीजी हसून त्या व्यक्तीला म्हणाले सर्वात आधी तू पाच किलोचा दगड एका कपड्यात गुंडाळून कमरेला बांध आणि उद्या मला भेटायला ये. मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.

त्या व्यक्तीने स्वामीजींच्या आज्ञेचे पालन केले आणि घरी जाऊन कमरेवर एक दगड बांधला. काही तासांतच तो स्वामीजी जवळ गेला आणि म्हणाला गुरूजी तूम्ही मला एक प्रश्न विचारल्यावर एवढी मोठी शिक्षा का दिली? स्वामीजी म्हणाले तू हे ओझं काही तास ऊचलू शकला नाही. पण एक आई आपल्या बाळाला नऊ महीने पोटात सांभाळते. घरातील सर्व काम करते, थकवा आला तरी हसत राहते. या जगात आईपेक्षा जास्त सहनशील कोनीच नाही. यामुळे आईला महान मानले जाते.

कथेची शिकवन
आपण आपल्या आईचा नेहमी सन्मान केला पाहीजे. आईसोबतच सर्व महिलांचाही आपण आदर केला पाहिजे. कारण स्त्रियांची सहनशीलता पुज्यनीय आणि सन्मानीय असते.

X