आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आपल्या बाजूने असो किंवा नसो, आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत ग्रंथामध्ये कौरव आणि पांडवांच्या कथेच्या माध्यमातून जीवनात सुखी आणि यशस्वी राहण्याचे सूत्र सांगण्यात आले आहेत. कौरव अधर्मी होते आणि पांडव धर्म मार्गावर चालत होते. यामुळे भगवान श्रीकृष्णही पांडवांच्या बाजूने उभे होते. महाभारतामध्ये सांगण्यात आलेल्या नीतींचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो.

दु:खैर्न तप्येन्न सुखै: प्रह्रष्येत् समेन वर्तेत सदैव धीर:। 

दिष्टं बलीय इति मन्यमानो न संज्वरेन्नापि ह्रष्येत् कथंचित्।।

हा महाभारतातील आदी पर्वामधील श्लोक आहे. या श्लोकानुसार आपण वाईट काळात म्हणजे अडचणींमध्ये दुःखी होऊ नये. सुखाचे दिवस असल्यास जास्त आनंदी होऊ नये. सुख असो वा दुःख प्रत्येक स्थितीमध्ये प्रसन्न राहावे. दुःख आणि सुखासाठी समभाव राहावे. जे लोक या नीतीचे पालन करतात, त्यांचे आयुष्य यशस्वी होऊ शकते. येथे जाणून घ्या, या नीतीचे महत्त्व सांगणारी एक कथा...

  • कथेनुसार एका आश्रमात गावातील एका व्यक्तीने गाय दान केली. यामुळे एक शिष्य खूप खुश झाला. ही गोष्ट त्याने आपल्या गुरूला सांगितली, गुरु म्हणाले- चांगले झाले आता आपल्याला दररोज ताजे दूध मिळेल. काही दिवस गुरु-शिष्याला दररोज ताजे दूध मिळाले परंतु एके दिवशी तो दानी व्यक्ती आश्रमात आला आणि आपली गाय परत घेऊन गेला.
  • हे पाहून शिष्य दुःखी झाला. त्याने दुःखी मानाने गुरूला घडलेला प्रसंग सांगितला. गुरु म्हणाले- चांगले झाले, आता गायीचे शेण काढावे लागणार नाही. हे ऐकून शिष्याने गुरूला विचारले, तुम्हाला गाय परत नेल्याचे दुःख नाही झाले, आता आपल्याला ताजे दूध मिळणार नाही.
  • गुरु म्हणाले - आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये समभाव राहावे. हाच यशस्वी जीवनाचा मूळमंत्र आहे. गाय मिळाली त्यावेळी जास्त आनंदी झालो नाही आणि आता निघून गेली तरीही मला काहीही दुःख नाही.