आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद येथील अट्टल कार चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यामध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -वाशीम बायपास परिसरातून चोरट्यांनी घरासमोर उभी इनोव्हा कार चोरली होती. चोरी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या फुटेजवरून चोरट्याला पकडले. चोरटा हा औरंगाबादचा असून त्यांचा पूर्वेतिहास हा कारचोरीचा असल्याचे समोर आले आहे. 
हूजेफा अब्दुल हुसेन बत्तिवाला यांची एमएच ३४ एए ८३९६ क्रं.ची इनोव्हा कार शुक्रवारी चार चोरटयांनी ढकलत नेऊन त्यानंतर ती पळवल्याची घटना शनिवारी उजेडात आली होती. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पुराव्यांच्या आधारे औरंगाबादचा रहिवासी राजू भाऊसाहेब पाटील यास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून चोरी गेलेली इनोव्हा कार व चोरीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहेमद यांनी केली. 


आरोपीने दिली कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली 
संशयित आरोपी राजू पाटील यांच्या सुनंदा निवास प्लॉट नंबर ५१ सह्याद्री नगर औरंगाबाद येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत औरंगाबाद येथील शेख रईस, अमृतसर येथील हरप्रितसिंग उर्फ एचपी व पाजी यांचीही नावे सांगितली.

बातम्या आणखी आहेत...