1.25 लाख रुपयांचा मोटो रेजर (2019) लॉन्च, मिळेल 128GB स्टोरेज आणि 16 मेगापिक्सल सिंगल रिअर कॅमेरा


  • रेजर 2019 मध्ये दोन डिस्प्ले मिळतील, 2.7 इंच सेकंडरी डिस्प्लेमधून सेल्फी घेता येऊ शकते

दिव्य मराठी वेब टीम

Mar 16,2020 09:38:54 PM IST

गॅजेट डेस्क- मोटोरोलाने आपला लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन मोटो रेजर 2019 ला भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. लुक्सच्या बाबतीत हा 2004 मध्ये लॉन्च मोटोरोला रेजर V3 ने इंस्पायर्ड आहे. भारतीय बाजारात याची किंमत 1,24,999 रुपये आहे. याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या सिंगल व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या फोनला ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून लॉन्च केले. कंपनीने सांगितल्यानुसार, या फोनची सेल 2 एप्रिलपासून सुरू होईल. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरुन खरेदी करू शकता. भारतीय बाजारात या फोनची टक्कर सॅमसंगच्या फ्लिप स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी Z-फ्लिपशी आहे, या फोनची किंमत 1.10 लाख ये आहे. बाजारात हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या सिंगल व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

मोटोरोला रेजर 2019: किंमत, व्हॅरिएंट आणि ऑफर

कंपनीने मोटो रेजर 2019 ला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. याची किंमत 1,24,999 रुपये आहे.सिटी बँकेच्या डेबिट-क्रेडिट कार्डवरुन फोन खरेदी केल्यावर तुम्हाला 10 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. सोबतच 24 महिन्यांसाठी नो-एक्सट्रा-कॉस्ट-ईएमआयची सुविधादेखील उपलब्ध आहे.लॉन्चिंग ऑफर अंतर्गत रिलायंस जिओकडून डबल डेटा आणि डबल व्हॅलिडिटी बेनिफिट्स मिळतील.

मोटोरोला रेजर 2019: बेसिक स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज


अनफोल्ड: 6.2 इंच, फ्लेक्सिबल ओएलईडी, एचडी प्लस (876x2142 पिक्सल रेझोल्यूशन)

फोल्ड: 2.7 इंच, 600x800 पिक्सल रेझोल्यूशन, क्विक व्यू डिस्प्ले

सिम टाइप: ई-सिम सपोर्ट (सिम स्लॉट नाही)

कॅमरा: 16 मेगापिक्सल (फोल्ड) आणि 5 मेगापिक्सल (मेन डिस्प्ले नॉच)

ओएस: अँड्रॉयड 9 पाय

प्रोसेसर: ऑक्टा-कोर, क्वालकॉम स्नॅपड्रैगन 710 प्रोसेसर

रॅम: 6 जीबी

स्टोरेज: 128 जीबी

सिक्योरिटी: फिंगरप्रिंट स्कॅनर (बॉटम चिन)

बॅटरी: 2510 एमएएच विथ 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट

कनेक्टिविटी यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11,

4जी आणि जीपीएस

डायमेंशन

अनफोल्ड: 72x172x6.9 एमएम

फोल्ड: 72x94x14 एमएम

X