आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या हीरोइनची सोशल मीडिया केली जात आहे चेष्टा, कुणी म्हणाले प्लास्टिकचे दुकान तर कुणी म्हणाला - मॅडम, एवढा एटिट्यूड कशाचा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फिल्म 'गोल्ड' मध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारलेली अभिनेत्री मौनी रॉय काल एयरपोर्टवर दिसली. यादरम्यान मौनी यलो कलरच्या ड्रेसमध्ये होती आणि तिने ब्लॅक गॉगल्स लावलेले होते. मौनीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले. एक जण म्हणाला, 'ही तर शो ऑफ करत आहे, जशी काही करिना कपूर हीच आहे. जशी तशी एका फिल्ममध्ये काम मिळाले आहे आणि एटिट्यूड तर बघा.' तसेच एक युजर तर मौनीला प्लास्टिकची दुकान म्हणाला आणि पुढे म्हणाला, "मॅडम, एवढा एटिट्यूड कशाचा आहे.'

मौनीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात अभिषेक बच्चनसोबत केली होती. 2004 मध्ये आलेली फिल्म 'रन' मध्ये मौनीचा अभिषेकसोबत एका गाण्यामध्ये छोटासा रोल होता, जे खूप कमी लोकांनी नोटिस केले होते. मौनीने 2007 मध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. यानंतर तिने 'जरा नचके दिखा' (2008), 'कस्तूरी' (2008), 'पति पत्नी और वो' (2009), 'दो सहेलियां' (2010), 'फिर कोई है' (2010), 'देवो के देव महादेव' (2011), 'जुनून: ऐसी नफरत को कैसा इश्क' (2012) आणि 'नागिन' (2018) अशा टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...