आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - जॉन अब्राहम आणि मौनी राय नुकतेच 'द वॉइस' या टीव्ही शो मध्ये गेले होते. दिव्यांका त्रिपाठी या 'शो'ची होस्ट आहे. दिव्यांकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन्ही अभिनेत्री एका कारणावरून एकमेकांशी भांडताना दिसत आहे. त्यांच्या भांडणामागे दुसरं तिसरं कोणतेही कारण नसून दोघींनाही जॉनसोबत काम करायचे आहे. मौनीचे म्हणणे आहे की, तिने यापूर्वी जॉनसोबत एका चित्रपटात काम केले आहे. यामुळे तिला पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करायचे आहे. यानंतर दिव्यांका येऊन म्हणते की, जॉनने मौनीसोबत एका चित्रपटात काम केलेच आहे तर मग आता त्याने तिच्यासोबत काम न करता माझ्यासोबत करावे.
सोबत काम करण्यासाठी जॉनने ठेवली ही अट
जॉन अब्राहम दोन्ही अॅक्ट्रेसमुळे परेशान होऊन म्हणतो की 'दोघींनी मला खूप नाचवले आहे. तर आता तुमची पाळी आहे. दोघींपैकी जी डान्समध्ये जिंकेल मी त्याच्यासोबत काम करेन.' खरं तर जॉन आणि मौनी 'रॉ' चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी या शो मध्ये गेले होते तेव्हाचा हा प्रसंग आहे.
दिव्यांकाने जॉनची पत्नी बनण्याचे केले नाटक
सगळ्या प्रसंगानंतर दोन्ही अभिनेत्रीं पुन्हा एका भांडण करतात. पण यावेळी वेगळेच कारण होते. जॉनची पत्नी कोण होईल यावरून हा वाद सुरू होता. दिव्यांका मौनीला म्हणते की, 'माझ्या आणि माझ्या पतीमध्ये तू येऊ नकोस'. तर तिच्या प्रत्युत्तरात मौनी म्हणते की, 'आम्ही सात फेरे घेतले असून तूच आमच्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस'. नंतर दिव्यांका जॉनला स्वतःकडे खेचत म्हणते की, 'त्यांनी अगोदर माझ्याशी विवाह केला आहे.' अशाप्रकारे दोघी जॉनला आपल्याकडे ओढून घेत चांगलाच वाद घालतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.