आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या हीरोइनच्या लुकची सोशल मीडियावर उडवली जात आहे खिल्ली, एक यूजर म्हणाला, 'सर्जरी करून करून चेहऱ्याची वाट लावली आहे' तर एकाने विचारले, 'एवढी प्लास्टिक सर्जरी का केलीस'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मौनी रॉय अशातच मुंबईमध्ये एका इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी मौनीने ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता. तिचा ओव्हरऑल लुक पाहून सोशल मीडियावर खूप वाईट कमेंट्स येत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, 'सर्जरी करून करून चेहऱ्याची वाट लावली आहे' तर आणखी एका यूजरने लिहिले, 'हिची प्लास्टिक सर्जरी बिघडली आहे' दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'एवढी सर्जरी करून घेतल्यानंतर आता ही खूप भयानक दिसत आहे.' मौनीने अक्षय कुमारसोबत फिल्म 'गोल्ड' मध्ये काम केले होते. 

- मौनीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात अभिषेक बच्चनसोबत केली होती. 2004 मध्ये आलेल्या फिल्म 'रन' मध्ये मौनीचा अभिषेकसोबत एका गाण्यामध्ये छोटासा रोल होता, जे खूप कमी लोकांनी नोटिस केले. 

- मौनीने 2007 मध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. यानंतर तिने 'जरा नचके दिखा' (2008), 'कस्तूरी' (2008), 'पती पत्नी और वो' (2009), 'दो सहेलियां' (2010), 'फिर कोई है' (2010), 'देवो के देव महादेव' (2011), 'जुनून: ऐसी नफरत को कैसा इश्क' (2012) सारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले होते. 

सोशल मीडियावर आल्या कमेंट्स... 
- एकेकाळी ही चांगली दिसत होती, आता तर वरून खालपर्यंत प्लास्टिक दिसत आहे. 
- एवढी सर्जरी करून घेतली आहे की, ही आता पूर्ण फेक दिसत आहे. 
- आधी ही खूप सुंदर वाटायची, पण प्लास्टिक सर्जरी करून घेऊन मौनीची नॅच्युरल ब्यूटी संपली. 
- ही राखी सावंतसारखी दिसत आहे. 
- ही प्लास्टिक सर्जरीला प्रमोट करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...