आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानमुळे बॉलिवूड एंट्री मिळाली का? प्रश्न ऐकून भडकली टीव्हीची नागिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: टीव्ही सीरियलची 'नागिन' फेम अॅक्ट्रेस मौनी रॉय अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटातगृहात येईल. मौनीला सलमान खानमुळे बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली अशा चर्चा होत्या. परंतू मौनीने मुलाखतीत हे नाकारले. मौनी म्हणाली की, सर्वांनी लिहिले की, सलमान खानमुळे मला गोल्डमधून ब्रेक मिळला. परंतू याविषयी तुम्हाला चित्रपटाचे प्रोड्यूसर रितेश सिधवानी चांगले सांगू शकतात. माझ्या बॉलिवूड डेब्यूमध्ये सलमान खानची काहीच भूमिका नाही. मौनी म्हणाली की, मला विश्वसा बसत नाही की, लोक अशा बातम्या कुठून आणतात आणि का? 10 वर्षे काम केल्यानंतर, एक बंगाली असल्याच्या कारणाने मी बंगाली कॅरेक्टर साकारु शकत नाही? मला हे खुप वाईट वाटले. मीडियाने मला कधीच चांगली अॅक्टर म्हणून कव्हर केले नाही. मला लाइमलाइटमध्ये येण्याची ही संधी होती, परंतू मला लाइमलाइट मिळाला नाही. 


बालपणापासून सलमानची फॅन 
मौनी म्हणाली की, मी बालपणापासून सलमानची फॅन आहे. त्यांची रिस्पेक्ट करते. परंतू याचा असा अर्थ होत नाही की, मी त्यांच्या नावाने पब्लिसिटी मिळवू. मी लहान होते तेव्हापासून त्यांचे पोस्टर आणि फोटो कलेक्ट करतेय. सलमानने माझ्या कामाची स्तुती केली असेल, आम्ही एकत्र शोमध्ये कामही केले असेल. परंतू अजूनही मला त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून एकही कॉल आलेला नाही. 

 

दबंग-3 साठी कॉल नाही
मौनीला विचारण्यात आले की, सलमानच्या दबंग-3 मध्ये तुम्ही काम करत आहात का, यावर ती म्हणाली की, नाही मला या चित्रपटातून अजून कोणताही कॉल आलेला नाही. 

 

'ब्रम्हास्त्र'मध्ये मौनी साकारणार निगेटिव्ह भूमिका 
पुढच्यावर्षी मौनीचा अजून एक चित्रपट येतोय. त्याचे नाव 'ब्रम्हास्त्र' आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉयजवळ स्पेशल पावर्स असतील. रणबीर आणि आलिया प्रमुख भूमिकेत दिसतील. तर मौनी रॉय निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. मौनीचा लुक VFXच्या मदतीने हायलाइट करण्यात येईल. यासोबतच मौनी जॉन अब्राहमसोबत RAW मध्येही दिसणार आहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...