Home | Khabrein Jara Hat Ke | Mournful family after son death villagers who came to help

मुलाच्या मृत्यूच्या धक्यामध्ये होते कुटुंब, सांत्वन करण्यासाठी पोहोचले लोक, खराब होत असलेली पिके पहिली तर सर्वच पोहोचले शेतामध्ये आणि पाहता पाहता 100 लोकांनी पूर्ण केले काम 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 15, 2019, 11:57 AM IST

100 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी अशी केली शोकग्रस्त कुटुंबची मदत... 

  • Mournful family after son death villagers who came to help

    एंटरटेन्मेंट डेस्क : पिके कापणारे हे हात एका कुटुंबावर आलेल्या विपत्तीच्यावेळी मदतीसाठी पुढे आलेले आहेत. झाले असे की, दयाकौर गावातील निवासी भूरालाल पालीवाल यांचा 18 वर्षांचा मुलगा गणपतरामचा मृत्यू चार दिवसांपूर्वी रायपुर छत्तीसगडमध्ये झाला. तो तिथे फर्नीचरचे काम करणाऱ्या आपल्या भावाला भेटायला गेला होता.

    एकाएकी त्याच्या पोटात दुखायला लागले आणि त्याचे स्वास थांबले. शेतीपोटी आणि घराची जबाबदारी सांभाळणारा एक महत्वाचा माणूस एकदम नाहीसा झाला. ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी त्या कुटुंबाला जसे तसे सांभाळले. पण शेतात गहू आणि जिऱ्याचे पीक काढायला आले होते आणि दुसरीकडे पर्यावरण विभागाने चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती.

    सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांचे पीक काढले...
    अशा परिस्थितीमध्ये सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांनी त्यांचे पीक काढायला त्यांची मदत करायचे ठरवले. शनिवारी सुमारे 100 ग्रामस्थ पिके कापण्यासाठी आले. दुपारपर्यंत जीरा आणि गहूची पिके काढली गेली. कुटुंबाने जेव्हा 100 लोकांना काम करताना पहिले तेव्हा सर्वचजण रडू लागले.

Trending