आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क. रोटी कपडा और मकान, घायल आणि पीकू सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री मौसमी चटर्जी आपल्या मुलीमुळे चर्चेत आहे. गुरुवारी 70 वर्षांच्या मौसमी पती जयंत मुखर्जीसोबत मुंबई हायकोर्टात पोहोचल्या. येथे त्यांनी आपली लेक पायलची देखरेख करण्याची परवानगी मागितली. सध्या पायल ही कोमात आहे. पायलचा नवरा डिकी मेहता तिची योग्य काळजी घेत नसल्याचे आरोप मौसमीने लावले आहे.
याचिकेत काय लिहिले
याचिकेनुसार डिकी मेहतासोबत लग्नानंतर पायल गंभीर आजारी राहत आहे. गेल्यावर्षी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिची आई आणि इतर कुटूंबातील सदस्य तिची देखरेख करत होते. काही महिन्यांनंतर पायलला डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर खार परिसरातील तिच्या घरातच तिच्यावर उपचार सुरु होते. मौसमीचा दावा आहे की, तिच्या कुटूंबातील कुणालाही पायला भेटायला जाऊ दिले जात नाही.
डिकी फॉलो करत नाही डॉक्टरांचा सल्ला
एका रिपोर्टनुसार, याचिकेत म्हटले आहे की, 28 एप्रिल 2018 ला मेहता कुटूंब पायलला घरी घेऊन आले. डिकीने पायलच्या देखरेखीसाठी नर्स ठेवली होती. तिने पायलचे डायट आणि फिजियोथेरिपकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. पण डिकीने पायलची फिजियोथेरिपी केली नाही आणि तिच्या डायटमध्येही बदल केले नाही. तिने स्टाफचे पेमेंटही रोखले, यामुळे नर्स काम सोडून निघून गेली.
पोलिसात केली तक्रार
मौसमीचा दावा आहे की, डिकीने त्यांना मेडिकल रिपोर्ट्सही दाखवले नाही. याप्रकरणी 20 नोव्हेंबरला मौसमीने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये तिने लेकीचे आयुष्य वाचवण्यासाठी लवकरात लवकर मदत मागितली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.