आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या समर्थनार्थ केजमध्ये आंदोलन, रस्त्यावर टायर पेटवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीला सामोरे जात असून सरकार त्यांना टार्गेट करीत आहे, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी केज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर केज - मांजरसुंबा रस्त्यावरील पिंपळगाव फाट्यावर टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावल्यापासून मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गुरुवारी राज ठाकरे हेे आपल्या कुटुंबीयांसह ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.  ठाकरे यांना सरकार जाणीवपूर्वक टार्गेट करीत आहे, असा आरोप करीत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस व कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी १२ ते १.१५ वाजेच्या दरम्यान केज शहरातील भवानी चौकात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुतळा विझवून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. या वेळी मनसे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण केदार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राज यांच्या समर्थनार्थ केज मध्ये मनसेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर टायरही पेटवून दिले
 

जिल्हाध्यक्ष धसांसह चौघे ताब्यात, गुन्हा नोंद
केज पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, मनसे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण केदार, मनसेचे तालुका उपाध्यक्ष विक्की पोपळे, गोविंद ढाकणे यांना ताब्यात घेतले. विशेष शाखेचे कर्मचारी मतीन पठाण यांच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...