आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे जिल्हाभर आंदोलन; तहसीलवर मेंढ्यांचा माेर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ नाशिकराेड- सहा महिन्यांत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन युती शासनाने दिले होते. मात्र, चार वर्षे हाेऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने जळगाव निंबायती, सटाणा व नांदगाव येथे आंदोलन करण्यात आले. 


सटाणा शहर व बागलाण तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मेंढ्यांचा कळप व अनेकांनी पिवळा फेटा, धोतर परिधान करून घोंगडी खांद्यावर व हातात काठी घेऊन मोर्चात सामील झाले होते. मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे रास्ता राेकाे अांदाेलन छेडले. मेंढ्यांसह रस्त्यावर एक तास ठिय्या दिल्याने पुणे-इंदूर राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. नांदगावी औरंगाबाद रस्त्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ समाजबांधवांनी ठिय्या मांडला. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 


नाशिकरोड येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात अाले. यावेळी एसटी आरक्षण त्वरित लागू करावे, सोलापूर विद्यापीठास राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, मेंढ्या चारण्यासाठी कुरणे राखीव करण्यात यावी, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात अाले. यावेळी नवनाथ ढगे, श्रावण लांडे, नितीन धानापुणे, रामदास भांड, सुनील ओढेकर, शशी वाघ, दिलीप पाटील, शिरीष चव्हाण, नवनाथ शिंदे, शिवाजी ढगे, आप्पा माने, आबा सोनवणे, श्रावण शेंडगे, नवनाथ शिंदे, ऋषिकेश शिंदे, विनायक काळदाते, महेंद्र सोनवणे, अविनाश वाघ, आशा जाधव यांच्यासह अनके जण सहभागी झाले हाेते. 


लखमापूरला समाजबांधवांतर्फे रास्ता राेकाे 
चौफुलीवर सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. सटाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सरपंच किरण कांदळकर यांच्याशी चर्चा केली. पोलिस काॅन्स्टेबल बस्ते यांना निवेदन देत रास्ता रोको मागे घेतला. यावेळी सरपंच किरण कांदळकर, दिनेश सोनारे, बापू साळे, संपत कांदळकर, समाधान कांदळकर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...