आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधव तहसील कार्यालयासमोर एसटी आरक्षणासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने शेड्युल्ड ट्राईब महाराष्ट्र राज्यासाठी सूची २ प्रमाणे एसटी आरक्षणामध्ये ४७ जातींचा समावेश केला. त्यामधील ३६ क्रमांकावर ओरान धनगड असा धनगर जातीचा उल्लेख आहे. इंग्रजी, हिंदी उच्चाराप्रमाणे त्या ठिकाणी धनगरऐवजी धनगड असे झालेले आहे. सदर ठिकाणी 'र' ऐवजी 'ड' असा उच्चार केलेला असून तोच आमच्या समाजाच्या अंगलट आला अाहे. 


गेल्या ४० वर्षांपासून मागणी करूनही धनगर समाजाची एसटीमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. वास्तविक घटनेने आम्हास आरक्षण दिले असताना आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेकवेळा मोर्चे, आंदोलने करूनही मागणी करून कुठल्याही सरकारने याची दखल घेतलेली नाही. बारामती येथे २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून शब्द दिला होता. परंतु अद्याप आम्हाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणूनच राज्य पातळीवरील सर्व राज्यांतील नेते व कार्यकर्ते यांची पुण्यात बैठक झाली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सर्व तहसील कार्यालयांवर आंदोलने करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...