आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील अांदाेलने स्थगित; नाशिक समिती हाेणार सहप्रतिवादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मराठा समाजाच्या ठिय्या अांदाेलनाला दगडफेकीचे गालबाेट लागल्याने तसेच शहरात त्याचे पडसाद उमटल्याने राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय हाेईपर्यंत जिल्ह्यातील अांदाेलनांना स्थगिती देण्यात अाली अाहे. या काळात काेणी अांदाेलन केल्यास जिल्ह्यातील समिती त्यास जबाबदार राहणार नाही. ही माहिती जिल्हा समन्वय समितीने पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि. १०) दिली. अारक्षणाच्या निर्णयावरील स्थगिती उठविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील समिती उच्च न्यायालयात सहप्रतिवादी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

विनापरवानगी मोर्चा, आठ आंदोलकांवर गुन्हा 
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज आंदोलकांसह विनापरवानगी मोर्चा काढून दहशत निर्माण करत दुकानांवर दगडफेक करणाऱ्या व दुकान बंद करण्यास सांगणाऱ्या आठ आंदोलकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी महापौरांसह ज्येष्ठ वकील आणि माजी पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...