आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : माजी मिस वर्ल्ड आणि 'पृथ्वीराज' या चित्रपटातून डेब्यू करत असलेली अभिनेत्री मानुषी छिल्लरच्या वडिलांना मुंबईच्या मूव्हर्स आणि पॅकर्सने 58 हजार रुपयांना फसवले आहे. मानुषीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडून नगदी पैसे घेतले होते आणि त्या दिवसापासून ते लोक संपर्कात नाहीत.
मानुषीचे वडिल डॉ. मित्रा बसु छिल्लर डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहेत. मुंबई मिररच्या बातमीनुसार, त्यांना ही कंपनी ऑनलाइन मिळाली होती. ज्यांच्यासोबत त्यांनी डील केली. कंपनीने रिस्पॉन्स न दिल्यानंतर डॉ. मित्रा यांनी वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली. त्यानंतर पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे.
यामुळे पडली गरज...
52 वर्षीय डॉ. मित्रा बसु नेव्हल डॉकयार्डमध्ये काम करतात. त्यामुळे ते जुलैमध्ये आपले घर वांद्र्यातून अंधेरीमध्ये शिफ्ट करणार होते. त्यांनी विखरोळीच्या मूव्हर्स पॅकर्सला ऑनलाइन या कामासाठी अपॉइंट केले होते. त्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी जावेद त्या दिवशी घेऊन पैसे घेऊन गेला. मात्र यासाठी डॉ. छिल्लर चेकने पेमेंट करण्याबद्दल बोलले पण जावेदने त्यांना कॅश किंवा ऑनलाइन पेमेंट कारण्यास सांगितले.
2 ऑगस्टनंतर डॉ. मित्रा यांनी काही कारणांमुळे शिफ्टिंग 7 ऑगस्टला करायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी जावेदला बोलावले. यावर जावेदने वर्कर नाही असे म्हणत काम दुसऱ्या दिवसावर टाळले गेले. पोलिसांनी जावेद नावाच्या व्यक्तीवर आयपीसी कलम 34 आणि कलम 420 च्या अंतर्गत टाकणार दाखल केली.
आगामी 'पृथ्वीराज'मध्ये दिसणार आहे मानुषी छिल्लर...
मानुषीबद्दल बोलायचे तर ती सध्या अक्षय कुमारसोबत आपला पहिला चित्रपट 'पृथ्वीराज' चे शूटिंग सुरु केले आहे. ती चित्रपटात राणी संयोगिताच्या रोलमध्ये दिसणार आहे. पृथ्वीराज पुढच्यावर्षी 2020 मध्ये दिवाळीला रिलीज होणार आहे. ज्याचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.