Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Movie on 'Nitin Gadkari'; teaser launched

आता गडकरींवरही येतोय चरित्रपट; 'गडकरी' या नावानेच अनुराग भुसारी यांनी केली चरित्रपटाची निर्मिती 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:08 AM IST

नागपुरातील व्यावसायिक राहुल चोपडा यांनी गडकरी यांची भूमिका रंगवली आहे.

  • Movie on 'Nitin Gadkari'; teaser launched

    नागपूर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांवर चित्रपट काढण्याची मालिकाच सुरू झालेली असताना त्यात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. गडकरी यांच्या व्यक्तिगत आणि राजकारणातील सार्वजनिक जीवनावर आधारित चरित्रपट लवकरच येत असून हा चरित्रपट केवळ यूट्यूबवर उपलब्ध राहणार आहे.

    नयनराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'गडकरी' या नावानेच नागपूरचे अनुराग भुसारी यांनी या चरित्रपटाची निर्मिती केली आहे. एक तासाच्या या चरित्रपटाचे टीझर मंगळवारी प्रदर्शित झाले. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा चरित्रपट यूट्यूबवर रिलीज होणार असल्याची माहिती भुसारी यांनी दिली. गडकरी यांचे राजकारणातील सार्वजनिक जीवन सर्वांनाच माहिती असले तरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंग केवळ त्यांच्या निकटवर्तीयांनाच माहिती आहेत. त्यामुळे या प्रसंगांना उजाळा देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे, असे दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.

    नागपुरातील व्यावसायिक राहुल चोपडा यांनी गडकरी यांची भूमिका रंगवली आहे. गडकरी यांच्या आयुष्यातील काही खासगी प्रसंग या चरित्रपटात दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेला आई आणि पत्नीचा प्रभाव, त्यांची कारकीर्द घडवण्यात या दोघींचे योगदान, संघाशी आलेला संबंध, गडकरी यांच्या स्वभावाचे विविध पैलू या चरित्रपटात मांडण्यात आले आहेत. . गडकरी यांचा संघ शाखेतील प्रवेश, पत्नी कांचनताई यांना पाहण्यासाठी गेलेले गडकरी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून झालेला संवाद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा प्रसंग या चरित्रपटात दाखवण्यात आला आहे.

Trending