आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Movie Review : 'Kabir Singh' Is A Story Of A Man Who Is Madly In Love, Shahid Has Done A Great Job

Movie Review : प्रेमात वेडा असलेल्या प्रियकराची कहाणी आहे 'कबीर सिंह', शाहिदने केले उत्तम काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कबीर सिंह तेलगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी' चा हिंदी रीमेक आहे. ओरिजिनल चित्रपटाला डायरेक्ट करणाऱ्या संदीप वांगानेच चित्रपट 'कबीर सिंह' चेही दिग्दर्शन केले आहे. ही अशा एका हुशार मेडिकल स्टुडंटचे आयुष्य सांगते, जो एका मुलीच्या प्रेमात स्वतःचे आयुष्य, करिअर सर्वकाही बरबाद करून टाकतो. 

 

'कबीर सिंह' च्या अवतीभोवती फिरते ही कहाणी... 
ही कथा कबीर सिंह म्हणजेच शाहिद कपूरच्या अवतीभोवती फिरते, जो प्रतिभाशाली आहे आणि दिल्ली मेडिकल कॉलेज यासाठी निवडतो कारण त्याला तेथील थंडी फार आवडते. कबीरची भूमिका खूपच रंजक आहे. तो एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि नेहमी तेच करतो जे त्याला योग्य वाटते. जेव्हा कॉलेजचे डीन (आदिल हुसैन) सल्ला देतात की, त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तर तो तर्क लावतो आणि म्हणतो की, माझी लढाई अन्यायाविरुद्ध आहे.  

 

मेडिकल स्टुडन्टवर करतो प्रेम... 
कबीरला आपल्या कॉलेजमध्ये आलेल्या 19 वर्षांची मेडिकल स्टुडंट प्रीती (कियारा आडवाणी) हिच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडतो. प्रेम एवढे वाढते की, कबीर, प्रीतीसाठी पार वेडा होतो. जेव्हा प्रीतीचे कुटुंबीय कबीरला स्वीकारायला नकार देतात तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटतो. प्रकरण खूप जास्त वाढते तेव्हा कबीरचे पिता (सुरेश ओबेरॉय) त्याला घराबाहेर काढतात. कबीरचा मित्र शिवा (सोहम मजूमदार) प्रत्येकवेळी त्याची साथ देतो.  

 

कबीरचे जवळचे लोक त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो स्वतःला बरबाद करून घेतो. कबीरमध्ये हीरोसारखी कोणतीच गोष्ट नाहीये. तो श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहे आणि गर्लफ्रेंडला आपली संपत्ति समजतो. वांगाने हे कुठेही दाखवले नाही की, त्यांचा हीरो परफेक्ट आहे.  

 

शाहिदने उत्तमप्रकारे पेलली भूमिका... 
ओरिजिनल चित्रपटाचा हीरो विजय देवरकोंडासारख्या पर्सनॅलिटी आणि अॅटीट्यूड शाहिद कपूरमध्ये नाहीये. तरीही त्याची कडक मेहनत स्पष्टपणे दिसते.  त्याला चित्रपटात एका यंग स्टुडंट आणि मग दारुड्या डॉक्टरची भूमिका साकारली होती, जी त्याने उत्तमप्रकारे पेलली आहे. कियारा आडवाणीने चांगला सपोर्ट केला आहे, पण ती केवळ 19 वर्षांची निरागस मुलगी दिसत नाही. सपोर्टिंग कास्ट जसे की, सोहम मजूमदार, सुरेश ओबेरॉय आणि निकिता दत्ताने जबरदस्त काम केले आहे.