आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'लैला मजनू\'ची प्रेमकथा एका नव्या ढंगात, एकदा बघायलाच हवा चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 3.5/5
कलाकार तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, सुमित कौल, मीर सरवर
दिग्दर्शक साजिद अली 
निर्माते शोभा कपूर आणि एकता कपूर 
संगीतकार  निलादरी कुमार आणि जॉई बरुआ 
श्रेणी 

रोमँटिक ड्रामा 

कथा: चित्रपटाची कथा काश्मिरच्या सुंदर खो-यात सुरु होते. लैला (तृप्ती डिमरी) एक इंट्रेस्टिंग व्यक्तिरेखा आहे. ती तिच्या सौंदर्यसाठी ओळखली जाते. पुरुषांकडून मिळणारे अटेंशन ती एन्जॉय करते. आपल्या सौंदर्यावर ती स्वतःच फिदा असते. जेव्हा कैस (अविनाश तिवारी) लैलाला भेटतो तेव्हा दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात. 


कैसविषयी असे म्हटले जाते की, तो दारुडा आहे. कैसविषयीच्या अशा काही गोष्टी लैलाला समजतात की तिचा इंट्रेस्ट त्याच्यात वाढत जातो. फ्लर्टपासून सुरु झालेली गोष्ट प्रेमात बदलते. कैस, लैलाकडे ओढला जातो, पण येथून त्याच्या विनाशाला सुरुवात होते. लैलाचे वडील (परमीत सेठी) एक पॉवरफुल व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा कैसचे वडील (बेंजामिन गिलानी) यांच्यासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु असतो. त्यामुळे दोघांचेही कुटुंबीय लैला-कैसचे प्रेम स्वीकारत नाही. कैस देश सोडून निघून जातो. चार वर्षांनी जेव्हा तो परत येतो, तेव्हा तो वेडा झालेला असतो. 

 

दिग्दर्शन : इम्तियाज अली यांचा रोमँटिक धाटणीचे चित्रपट बनवण्यात हातखंडा आहे. त्यांनी लैला मजनूची प्रेमकथा नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणली आहे. हा चित्रपट त्यांचा भाऊ साजिद यांनी दिग्दर्शित केला आहे. साजिद यांनी चित्रपटाला पूर्ण न्याय दिला आहे. साहसी लैला आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या मजनूचे पात्र त्यांनी उत्तमरित्या पडद्यावर साकारले आहे. शशांक भट्टाचार्य यांनी उत्तम सिनेमॅटोग्राफी करुन काश्मिरचे सौंदर्य दाखवले आहे. साजिद यांनी इंटीमेट सीनचा वापर न करता प्रेमाचे रंग दाखवले आहेत.   

 

अभिनय : या चित्रपटाचे प्रमुख पात्र कैस आहे, तो चित्रपटाची ताकद आहे. तृप्ती देखणी आहे आणि तिने तिच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. पण कैसची भूमिका साकारणारा अविनाश तिवारी चित्रपटाचा जीव आहे. इम्तियाज अली यांनी कैसच्या पात्रावर फोकस केले. अविनाशने त्याच्या भूमिकेत जीव ओतला आहे. साजिद यांनी 2 तास 15 मिनिटांच्या या चित्रपटाला कुठेही भरकटू दिलेले नाही. चित्रपटावर कुठेकुठे सूरज बडजात्यांच्या 'मैंने प्यार किया'चा प्रभाव दिसून येतो. या चित्रपटातही कबूतर प्रेमाच्या संदेशाची देवाण-घेवाण करतात.  

 

संगीत : संगीत ही चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. चित्रपटात तब्बल 10 गाणी आहेत, पण अजून गाणी चित्रपटात असायला हवी होती, असे वाटते. संगीतकार निलादरी कुमार आणि जॉई बरुआ यांनी उत्कृष्ट काम केले आहे. हे यावर्षीचे उत्कृष्ट संगीत ठरु शकते.  

 

बघावा की नाही : हा चित्रपट एकदा नक्की बघायला हवा. कारण अशी लव्ह स्टोरी आजच्या काळात फार क्वचित बघायला मिळते. 

 

बातम्या आणखी आहेत...