आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सस्पेन्स-थ्रिलरचा विषय चांगला, परंतु गुंतागुंतीची कथा आणि एडिटिंगमध्ये फसलेला मल्टीस्टारर 'मलंग'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग2.5/5
स्टारकास्टआदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी, अनिल कपूर, कुणाल खेमू
दिग्दर्शकमोहित सूरी

निर्माता

लव रंजन, भूषण कुमार, अंकुर गर्ग, कृष्ण कुमार
संगीतकारअसीम अजहर, अंकित तिवारी, वेद प्रकाश शर्मा, मिथुन राजू सिंह
श्रेणीरोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर
कालावधी134 मिनिटे

 

बॉलिवूड डेस्कः  'मलंग' ही कथा साध्यासरळ एका जोडप्याची कहाणी आहे. आईवडिलांच्या वागणुकीला कंटाळून सारा (दिशा पटानी) भारतात येते तर अद्वैत (आदित्य रॉय कपूर) सुद्धा आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून आपले जीवन जगण्यासाठी घर सोडतो. गोव्यात ख्रिसमस सोहळ्यादरम्यान दोघांची भेट होते. येथे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सारा आई होणार असते, त्याचकाळात पोलिसांसमवेत एक अपघात घडतो, ज्याने दोघांचे आयुष्य बदलते. हे दोघे पोलिस अधिका-यावर कशाप्रकारे सूड घेतात हे चित्रपट बघितल्यानंतर कळेल.


या सस्पेन्स-थ्रिलर कथेचा विषय चांगला निवडला गेला आहे, परंतु कथेची शैली आणि  एडिटिंग इतके गोंधळलेले आहे की, डोक्याला ताण दिल्यानंतरच दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे ते समजेल. एकीकडे आदित्य आणि दिशाच्या फ्लॅशबॅकची कहाणी सुरु आहे तर दुसरीकडे, त्यांच्यातील प्रेम-प्रणय आणि पोलिसांसोबतचा झगडा दाखविला आहे. अनिल कपूरला ग्रे शेड पोलिस ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत अनोख्या अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु  त्यांची हसण्याची पद्धत आणि केस सोडवण्याची शैली प्रभाव सोडत नाही. कुणाल खेमू असा पोलिस अधिकारी बनला आहे ज्याला आपल्या पुरुषत्वावर विश्वास नाही. कुणालचे काम लक्ष वेधून घेते.


आदित्यचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन ठीक दिसते. त्याच्या व्यक्तिरेखेवर केलेली मेहनतही दिसून येते. चित्रपटात लोकेशन्सची निवड योग्य झाली आहे, जे वास्तविक वाटतात. चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलताना 'हूई मैं मलंग ...' असे एक पार्टी गाणे झाले आहे, हे नि: संशय पार्टीच्या कार्यक्रमात झळकणार आहे. याशिवाय शीर्षकगीतही चांगले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या यशाचा निर्णय प्रेक्षक घेतील, पण पाच स्टारपैकी द्यायचे झाले, तर चित्रपटाल केवळ अडीच स्टार दिले जाऊ शकतात.