आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : स्पोर्ट ड्रामा पसंत करणारे आणि अक्षय कुमारचे फॅन असणा-यांसाठी आहे \'गोल्ड\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  गोल्ड
स्टार 3/5
कलाकार अक्षय कुमार, मौनी रॉय, अमित साध, कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, सनी कौशल, निकिता दत्ता, दलीप ताहिल
दिग्दर्शिका रिमा कागती
संगीतकार सचिन-जिगर 
श्रेणी  ड्रामा

 

'गोल्ड' या चित्रपटाची कथा 1948 साली लंडनमध्ये झालेल्या 14व्या ऑलिंपिकमध्ये भारताच्या विजयाची आहे. स्वातंत्र्याच्या वर्षभरानंतर हे यश भारताला मिळाले होते. हॉकी या खेळात भारताने सुवर्णपदकाची कमाई केली होती. एका स्वतंत्र देशाच्या रुपात भारताचे खेळाडू देशासाठी खेळू शकतात, हे सिद्ध झाले होते. 

 

1948च्या भारतीय हॉकी टीमचा मॅनेजर तपण दास (अक्षय कुमार) याच्याभोवती फिरणारी ही कथा आहे. 1936 च्या वर्ल्डकप हॉकी मॅचने चित्रपटाची सुरूवात होते. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता. त्यामुळे ब्रिटीश टीम इंडिया मैदानावर खेळत असते आणि तपणदास या ब्रिटीश टीम इंडियाचा मॅनेजर असतो. भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक मिळवतो. पण भारतीय खेळाडूंना डावलून या विजयाचे सगळे श्रेय ब्रिटीश इंडियाला दिले जाते. हे श्रेय भारतीय खेळाडूंचे आहे, तमाम भारतीयांचे आहे, हे तपण दासचे म्हणणे असते. पण ब्रिटीश इंडिया या सुवर्णपदकाचे श्रेय लाटतो. त्याच क्षणी पुढचे सुवर्णपदक स्वतंत्र भारताला मिळवून द्यायचे, असा निर्धार तपण दास करतो. पण दुस-या महायुद्धामुळे सलग दोन ऑलिंपिक सोहळे रद्द केले जातात. या दहा वर्षाच्या कालखंडात भारतीय क्रीडा क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होतो. भारतीय हॉकी संघाला या राजकारणाचा फटका बसतो. याचकाळात तपण दास मद्याच्या आहारी जातो. पण 1946 मध्ये पुढची ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये होणार, असे जाहिर होते आणि तपण दास पुन्हा पेटून उठतो. स्वतंत्र भारताची पहिली हॉकी टीम तयार करण्याच्या जिद्दीने पछाडलेला तपण दास स्वत:हून हॉकी फेडरेशनला भेटतो. हॉकी फेडरेशनचे प्रमुख त्याच्यावर विश्वास दाखवतात आणि तपण दास कामाला लागतो. स्वतंत्र भारताची हॉकी टीम बनवण्यासाठी तो अख्खा भारत पिंजून काढत एकापेक्षा एक सरस खेळाडू निवडतो. पण हे खेळाडू निवडताना भारत-पाक फाळणीच्या घडामोडींकडे त्याचे दुर्लक्ष होते. तपणदासची हॉकी टीम तयार होते. भारतही स्वतंत्र होतो. पण फाळणीने सगळे संदर्भ बदलतात. अनंत अडचणींवर तपन दास कसा मात करतो आणि स्वतंत्र भारतात हॉकीच पहिले सुर्वणपदक कसे मिळवून देतो, ही या चित्रपटाची कथा आहे.  

 

सर्वच स्पोर्ट चित्रपटांमध्ये संघर्ष, यश अपयश दाखवले जाते. गोल्ड चित्रपटातही हेच दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शिका रिमा कागती यांनी 40च्या दशकाला रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात त्यांना यश मिळाले आहे. पण काही ठिकाणी चित्रपटात उणीवादेखील आहेत. इंडियन हॉकी वर्ल्डच्या हिस्टोरिकल चॅप्टरसोबत एवढी ओढाताण करण्यात आली आहे की, चित्रपट एक मेलोड्राम बनतो, ज्यात स्पोर्ट दिसत नाही. रिमा कागती आणि राजेश देवराज यांनी या चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रिनप्ले लिहिला आहे. देशाभिमान आणि भारतीय ऐक्यावर हा चित्रपट संदेश देतो, पण हा संदेश हृदयापर्यंत पोहोचत नाही. चित्रपटाची लांबी तीन तास आहे.

जावेद अख्तर यांनी लिहिले संवाद अनेक ठिकाणी मनात घर करुन जाणारे आहेत. चित्रपटात काही काही दृश्य उगाच ताणण्यात आले आहे.

 

अक्षय कुमारने उत्तम काम केले आहे. त्याने बंगाली तपन दासच्या व्यक्तिरेखेला पुरेपुर न्याय दिला आहे. अक्षयसोबतच कुणाल कपूर, विनीत सिंह, अमित साध आणि नवोदित सनी कौशलनेही चांगले काम केले आहे. कौशलने हिम्मत सिंहच्या भूमिकेत जीव ओतला आहे. हीरोईन चित्रपटात केवळ शोभेची बाहुली वाटते. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणा-या मौनी रॉयच्या वाट्याला फारसे काम आलेले नाही. चित्रपटात अभिनय करण्याचा तिला स्कोपच नव्हता. 

 

रिमा कागती यांच्याकडून एका चांगल्या चित्रपटाची अपेक्षा होती. त्यांनी यापूर्वी आमिर खानसोबत तलाशसारखा पॉवर पॅक्ड चित्रपट बनवला होता. चित्रपटातील फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफ जास्त खिळवून ठेवतो. जर तुम्ही स्पोर्ट ड्रामा पसंत करता आणि अक्षय कुमारचे फॅन आहात, तर एकदा चित्रपट बघायला हरकत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...