Home | Reviews | Movie Review | Movie Review Of Sara Ali Khan and Sushant Singh Rajput Starer Hindi Film Kedarnath

Kedarnath Movie Review : प्रलयाभोवती फिरणारी प्रेमकहाणी, हृदयाला करत नाही स्पर्श

रोशनी शिंपी | Update - Dec 07, 2018, 03:20 PM IST

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे लक्ष वेधलेला दिग्दर्शक अभिषेक कपूर 'केदारनाथ'मध्ये प्रभाव दाखवू शकला नाही.

 • Movie Review Of Sara Ali Khan and Sushant Singh Rajput Starer Hindi Film Kedarnath
  चित्रपट केदारनाथ
  रेटिंग 2.5 स्टार
  कलावंत सारा अली खान, सुशांतसिंह राजपूत, नितीश भारद्वाज, अलका आमिन, सोनाली सचदेव, निशांत दहिया आणि पूजा गौर
  दिग्दर्शक अभिषेक कपूर
  कथा अभिषेक कपूर
  पटकथा कनिका ढिल्लोन
  संगीत अमित त्रिवेदी
  पार्श्वसंगीत हितेश सौनिक
  श्रेणी प्रेमपट

  अमृता सिंहची मुलगी सारा अली खान या नव्या चेहऱ्याने चुणूक दाखवली. तर, सुशांतसिंहने भूमिकेला 100 टक्के न्याय दिला. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केदारनाथचे सौंदर्य टिपण्यात यशस्वी ठरली.

  2013 च्या केदारनाथ प्रलयाभोवती फिरणारी प्रेमकथा या चित्रपटाच्या निमित्ताने गुंफण्यात आली आहे. सारा अली खानने आपल्या नव्या काेऱ्या अभिनय शैलीने प्रेक्षकांत चैतन्य निर्माण केले. तर तुषार कांती राय यांनी केलेली चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही विशेष नमुद करण्यासारखी आहे. कारण, केदारनाथ महाप्रलय पुढील 100 वर्षे लक्षात राहणारा आहे. या प्रलयाचे महाभयंकर रौद्र रुप, त्याच्या झळा बसलेले लोक आणि बातम्यांतून हा प्रलय अनुभवलेले भारतीय यांना चित्रपटात हा थरार पुन्हा अनुभवायला येतो. पाण्यातील दृष्य खूपच सुंदर चित्रीत झाले आहेत. या तमाम गोष्टी लक्ष वेधत असल्या तरीही चित्रपटातील प्रेमकहाणी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करू शकत नाही. प्रेमातील गहिरेपणा दिसत नाही. दिग्दर्शकाचे कौशल्य कमी पडले असे वाटते. चित्रपटाची कथा चांगली आहे. पण, पटकथा कमजोर झाल्याने अपेक्षित परिणाम दिसत नाही. 'काय पो छे'मध्ये भुकंपाचा उत्तम वापर जमुन आला तसे केदारनाथमध्ये प्रलयाचा मेळ बसला नाही. 70 हजारांहून अधिक कुटूंबांना उध्वस्त करणारा अन् हजारोंचे आयुष्य पुर्णपणे पालटून टाकणारा हा प्रलय चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकत नाही.

  प्रलयाभोवतीची प्रेमकहाणी चांगली गुंफली पण त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहचतच नाहीत. हिंदू आणि मुस्लिम हा प्रेमकथेचा धागा आहे. हा विषय यापुर्वी वारंवार चघळला गेला असल्याने प्रेक्षकांना अपिल होत नाही.

  कथा

  केदारनाथ मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याची मुलगी मंदाकिनी उर्फ मुक्कू (सारा), पर्यटकांना सफर घडवणाऱ्या मंसूरच्या प्रेमात पडते. चुलबुली मुक्कू आणि शांत, नम्र मंसूर यांचे प्रेम केदारनाथच्या सुंदर निसर्गात हळूवारपणे फुलते. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांच्या या प्रेमात त्यांचा धर्म आडवा येतो. मुक्कूचा विवाह तिच्याच धर्मात केला जातो. मात्र, याचवेळी केदारनाथ महाप्रलय घडतो. अन, मग ज्याप्रमाणे फोर्सने आलेले पाणी आपली वाट काढत सर्वकाही नष्ट करत पुढे निघून जाते, तशीच प्रेमकहाणीही पुढे सरकते. शेवट काय होतो, ही उत्सुकता मात्र चित्रपटगृहात जाऊन पुर्ण करा.

  दिग्दर्शन

  अभिषेक कपूरकडून दिग्दर्शक म्हणून अपेक्षा अधिक होत्या. दोन वेगवेगळ्या गोष्टी या चित्रपटात गुंफण्याचा प्रयत्न त्याने केला. एक तर प्रलयाचे रौद्र रुप आणि दुसरे म्हणजे सुंदर प्रेम. मात्र, या दोन्हींची मोट बांधण्यात अपेक्षित यश आले नाही. चित्रपटाच्या पटकथेवर आणखी काम होणे अपेक्षित होते. सिनेमॅटोग्राफीच्या तोडीस तोड कथा फुलली असती तर चित्रपट अधिक यशस्वी ठरली असती.

  अभिनय

  साराने पर्दापणातील अभिनयात चुणूक दाखवल्याने प्रेक्षकांना आगामी काळात एक संवेदनशिल आणि दमदार अभिनेत्री मिळणार असल्याची आशा तिने दाखवली आहे. सुशांतनेही त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय देणारा अभिनय अचूक केला आहे.

  संगीत

  चित्रपटाचे संगीत आधीच चर्चेत होते. गाणी चांगली झाली आहेत. तर पार्श्वसंगीतही लक्ष वेधते.

Trending