आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: 2 वर्षांची निरागस मुलगी दाखवते शहरी जीवनातील सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार रेटिंग   3
स्टारकास्ट मायरा विश्वकर्मा, प्रेरणा विश्वकर्मा
डायरेक्टर विनोद कापडी
प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूर, रॉनी स्क्रूवाला, शिल्पा जिंदाल
संगीतकार विशाल खुराणा
जॉनर   थ्रिलर
रनिंग टाइम   

93 मिनिटे

 

 

बॉलिवूड डेस्कः   घरात अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सुरु असलेली बालकनी आणि वाहत असलेला नळ या सर्व गोष्टी दोन वर्षांची मुलगी घरात एकटी असल्याचे दाखवून प्रेक्षकांना घाबरवण्यास पुरेशा आहेत. दिग्दर्शक विनोद कापडी यांनी चित्रपटाची सुरुवात अतिशय प्रभावीपणे केली आहे. दोन वर्षांची मुलगी पीहू सकाळी झोपेतून उठते. घरात सर्वत्र सामान अस्तव्यस्त पडलेले आहे. कारण आदल्याच रात्री पीहूची बर्थडे पार्टी झालेली असते. तिच्या शेजारी तिची आई झोपलेली असते. पण आईचा मृत्यू झाल्याचे त्या चिमुकल्या पीहूला समजत नाही. येथूनच घाबरवून सोडणारा अॅडव्हेंचर सुरु होतो.

 
कथा
चित्रपटाची सुरुवात 2 वर्षांची मुलगी ‘पीहू’ (मायरा विश्वकर्मा) पासून होते, ती घरात आईच्या शवासोबत राहते. तिचे वडील एका कामासाठी दोन दिवसासाठी कोलकाता गेलेले असतात. गेल्या रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते ज्यामुळे पूजा (प्रेरणा शर्मा) झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्या करुन घेते. मात्र पीहू समजते की, तिची आई जिवंत आहे आणि झोपली आहे. ती आईकडे जेवण मागते, दूध मागते, मात्र काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वत: जाऊन खाण्यापिण्याचे पदार्थ शोधून आणते. पुन्हा कसेतरी गेल्या रात्रीचे उरलेले पदार्थ मिळताता आणि ती खाते. वडिलांचा फोन येतो तर निरागसतेने बोलते की, आई झोपली आहे. चपाती शेकण्यासाठी ती गॅस पेटवते, ओव्हेन चालवते तर चपाती जळून जाते. नेमके काय होते घरात, काही अपघात होतो का, पिहूचे नेमके काय होते, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.  
 
लांबी बनवतो चित्रपट बोअरिंग
हा चित्रपट 93 मिनिटांचा आहे, पण एवढी लांबीही चित्रपट थोडा बोअरिंग बनवतो. प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवण्यासाठी काही भावनिक गोष्टी उगाच चित्रपटात जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाचा प्रभाव सेकंड हाफमध्ये थोडा कमी होतो.
 
मायराचे निरागस रुप आहे लोभसवाणे... 
दिग्दर्शक विनोद कापडीच्या या एक्सपेरिमेंटल चित्रपटाची प्रशंसा व्हायला हवी.  मायरा विश्वकर्मा या चिमुकलीने पीहूची व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने अतिशय निरागसपणे अभिनय केला आहे.  मायराने पीहूची भूमिका एवढी सहजतेने साकारली आहे की, आपण तिच्याशी जवळीकता साधू इच्छिणार आणि तिच्याविषयी आपल्याला सहानुभूतीही वाटेल.  

 

बातम्या आणखी आहेत...