आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Movie Review : The Movie 'Dream Girl' Expresses The Plight Of The Jobless And Lonely Youngsters In Small Cities

Movie Review : हसत हसत बेरोजगार आणि एकटेपणाची शिकार झालेल्या लोकांची दुर्दशा व्यक्त करतो चित्रपट 'ड्रीम गर्ल'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
   रेटिंग   4/5
   स्टारकास्ट        आयुष्मान खुराना, नुसरत भरुचा, अन्नू कपूर
   दिग्दर्शक     राज शांडिल्य
   निर्माता       एकता कपूर
   म्यूझिक डायरेक्टर   मीत ब्रदर्स
   जॉनर        कॉमेडी ड्रामा
   वेळ       132 मिनिटे 

 

बॉलिवूड डेस्क : 'ड्रीम गरला हा चित्रपट राज शांडिल्यचे पहिले डायरेक्टोरियल सादरीकरण आहे. येथेही त्याने आपल्या रायटिंगची जादू पसरली आहे. मथुरामध्ये ब्रिजच्या जमीनीवर त्याने कॉमेडीचा पंच आणि क्रिएशनने हास्याची उत्तम रासलीला रचली आहे. चित्रपट तास तर पूर्णपणे आयुष्मानचे पात्र करमभोवती फिरतो. याची थीम छोट्या शहरामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या सिस्टमवर निशाणा साधते. 
 

जाणून घ्या कसा आहे 'ड्रीम गर्ल'.... 
करमचे पिता जगजीत (अन्नू कपूर) यांचे मथुरामध्ये छोटेसे दुकान असते. बेरोजगार करमचे एक वैशिष्ठ्य असते की, त्याला मुलीचा आवाज उत्तम पद्धतीने काढता येतो. याचमुळे त्याला कॉलसेंटरमध्ये जॉब मिळतो. तिथे तो पूजा नावाच्या मुलीचा आवाज काढून आपल्या गोड गोड बोलण्याने लोकांचा एकटेपणा दूर करतो. त्यानंतर होते असे की, टोटो, महावीर, हवलदार, लेडी पत्रकार एवढेच नाही तर त्यांचे वडीलही पूजाच्या प्रेमात पडतात आणि लग्नासाठी तयार होतात. करमच्या आयुष्यातही माहीच्या प्रेमाची चाहूल लागते. याचदरम्यान पूजाचे चाहते करमच्या आयुष्यात महाभारत सुरु करतात आणि तो त्या चक्रव्यूहातून स्वतःला कसा वाचवतो याचबद्दल हा चित्रपट आहे. 
 
चित्रपटाचे रायटिंग स्मार्ट आहे. करमच्या रोलमध्ये आयुष्मान खुरानाने 'अंधाधुन' आणि 'बधाई हो' नंतर आणखी एक अविस्मरणीय परफॉर्मन्स दिला आहे. आवाज आणि बॉडी लँग्वेजद्वारे त्याने लोकांना खूप हसवले. माही आणि स्माइली बनलेल्या नुसरत भरुचा आणि मनजोत सिंहने आपल्या भूमिकांना डिसिप्लीनमध्ये ठेवले. डायरेक्टर राज शांडिल्यने छोट्या शहरातील लोकांचे हावभाव, ड्रेसिंग सेंसचा वापर कॉमेडी अजून उत्तम बनवण्यासाठी केला आहे. डायलॉग आणि एडिटिंग चांगले आहेत. मीत ब्रदर्सचे संगीत खूप प्रभावित करते. चित्रपट कुठेही निराश करताना दिसत नाही. 

बातम्या आणखी आहेत...