आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकगणिताने प्रभावित चित्रपट व जीवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय खन्ना आणि ऋचा चड्‌ढा अभिनीत व अजय बहल दिग्दर्शित चित्रपट 'सेक्शन 375' प्रदर्शित झालेला आहे. यावरून असे वाटते की, कथेच्या शोधासाठी चित्रपट निर्माते आता इंडियन पिनल कोड वाचायला तरी सुरू करतील. साहित्य आणि सिनेमात अश्लीलतेवर बनवलेल्या चित्रपटाचे नाव 'पिनल कोड २९२-२९४' ही ठेवले जाऊ शकते. राज कपूर यांनी 'श्री ४२०' चित्रपट बनवला. धोका देऊन पैसे लुटणाऱ्याला कलम ४२० अंतर्गत शिक्षा दिली जाते. चित्रपटांच्या नावामध्ये आकड्यांचा वापर अनेकदा झालेला आहे. उदाहरणार्थ, 'व्हिक्टोरिया नं. २०३' आणि मदन मोहला यांचा मनोजकुमार अभिनीत 'दसनंबरी' हा चित्रपट. हसरत जयपुरी यांनी 'जोकर'साठी लिहिलेले गीत असे होते..... 'तीतर के दो आगे तीतर, तीतर के दो पीछे तीतर, आगे तीतर, पीछे तीतर, बोलो कितने तीतर'। अमिताभ बच्चन आणि शशी कपूर अभिनीत चित्रपटाचे नाव होते, 'दो और दो पांच'. सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट 'चलती का नाम गाड़ी' मधील '..लेकिन पहले दे दो मेरा पांच रुपैया बारा आना..पांच रुपैया बारा आना' हे गीत फार गाजले. काही काळापूर्वी आनंद एल. राय सारख्या विद्वान चित्रपट निर्मात्याने शाहरुख खान अभिनीत 'झीरो' चित्रपट केला पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नावाप्रमाणेच झीरो ठरला. चेतन आणि देव आनंद यांचा छोटा भाऊ विजय आनंद यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द 'नौ दो ग्यारह' नावाच्या चित्रपटाने सुरू केला होता. निर्माते हबीब फैजल यांनी ऋषी कपूर आणि नीतू सिंह अभिनीत 'दो दुनी चार' केला होता. सुभाष घई यांनी दिग्दर्शन केलेल्या 'कालीचरण' चित्रपटात अंकांमध्ये एक रहस्य लपलेले असते. यातील पात्रे नेहमीच आपल्या हॉटेलमधील खोल्यांचे नंबर विसरत असतात. कधी कधी दरवाजा बंद करताना इंग्रजी ६ आकडा उलटून ९ होतो. जावेद अख्तर यांनी रमणकुमार यांच्या 'साथ साथ' चित्रपटापासून गाणी लिहिण्यास सुरुवात केली. पण विधू विनोद चोपडा यांच्या '१९४२ एक लव्ह स्टोरी' याठी त्यांनी लिहिलेल्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' गाण्यापासून ते एक लोकप्रिय गीतकार बनले. यात मुलीच्या सौंदर्यासाठी वेगवेगळ्या १७ उपमा वापरलेल्या आहेत. जावेद अख्तर यांच्या 'तेजाब' चित्रपटासाठी गाणे लिहिले, 'एक दो तीन चार…तेरा करूं गिन गिन के इंतजार' हे गाणे लोकप्रिय झाले. लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रम 'कौन बनेगा करोड़पती' मध्ये अँकर अमिताभ बच्चन हा स्पर्धकाला त्याने जिंकलेल्या रकमेचा चेक देताना त्याला विचारतो की, किती शून्य लिहू? अर्थात हा विनोदाचा भाग आहे. माहितीच्या कार्यक्रमाला सध्या ज्ञान म्हणून संबोधले जात आहे. तुरुंगात कैद्यांना नंबर दिलेले असतात. त्याच नंबरने त्यांना बोलावले जाते. या प्रथेमुळे अनेक वर्षे तुरुंगात पडलेले कैदी आपले नावही विसरून जातात. सलीम जावेद लिखित 'दीवार' चित्रपटात इस्लामी शुभ अंकाचा बिल्ला एकूण घटनाक्रमच बदलून टाकतो. आदित्य चोपडा यांच्या शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा अभिनीत 'वीरझारा' चित्रपटात कैद्याला त्याच्या नंबरने बोलावण्याचा मोठा नाटकीय उपयोग करण्यात आला आहे. नाना पाटेकर अभिनित चित्रपटात टॅक्सीचा नंबर 9211 दाखविला आहे. एनकाउंटर विशेषज्ञाच्या कथेवरून प्रेरित चित्रपटाचे नाव होते 'अब तक छप्पन'. आजच्या काळात मोबाइलचा नंबर बराच महत्वपूर्ण ठरला आहे. महत्वाचे नंबर आम्ही तर पाठही करून टाकतो. मानवी जीवन ही आकडयांचा मोठा खेळच बनला आहे.