आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणींच्या परस्पर प्रेमावरील चित्रपट आणि त्वचेच्या मर्यादा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिपस्टिक अंडर बुरखा' नामक मनोरंजनात्मक चित्रपट बनवणाऱ्या अलंकृता श्रीवास्तव, भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेन-शर्मा यांना घेत 'डॉली और किट्‌टी' बनवत आहेत. दोघा बहिणींचे जीवन आणि त्यांच्या परस्पर स्नेहाबद्दलचा हा चित्रपट आहे. कधी-कधी या संबंधांत वितुष्टही येते. भावांवरील प्रेम दर्शवणारे अनेक चित्रपट आले आहेत, पण पुरुषप्रधान समाजात बहिणींच्या प्रेमावरील चित्रपटांचे प्रमाण कमी आहे. नूतन व तनुजा आणि मधुबाला व चंचल या सख्ख्या बहिणी चित्रपटक्षेत्रात असून नूतन या श्रेष्ठ कलाकार आहेत. नूतन यांनी तारुण्यात अनेक प्रेमप्रधान चित्रपटांबरोबर 'सुजाता' आणि 'बंदिनी' सारख्या उत्कृष्ट भूमिकाही केल्या आहेत. विमल राॅय यांचा 'बंदिनी' म्हणजे नूतनसाठी 'मदर इंडिया'च. तारुण्यात अमिताभसोबत 'सौदागर'मध्ये काम केलेल्या नूतन यांनी आपल्या वृद्धापकाळातही सुभाष घईंच्या 'कर्मा' मध्ये उत्कृष्ट भूमिका बजावली. गुरुदत्त यांचा 'बहारें फिर भी आएंगी' हा शेवटचा चित्रपट, जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने पूर्ण केला. यातदेखील दोन बहिणींचे परस्परप्रेम व वैमनस्याची कथा होती. मूळ बंगाली भाषेतील 'प्रेसिडेंट' चित्रपटापासून कथा प्रेरित असून वडिलांच्या मृत्यूनंतर त्या व्यवसायाची जबाबदारी घेत मॅनेजरपदी एका युवकास नेमतात. ज्यावर नंतर तिचे प्रेम जडते पण त्याचे तिच्या सख्ख्या बहिणीवर प्रेम असते यापासून ती अनभिज्ञ असते. वास्तव समजल्यावर दोघीही आपले प्रेम त्यागण्यास तयार हाेतात. शोभा डे यांची 'सिस्टर्स' ही कादंबरी रंजक आहे. धन्नालाल शेठजींच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्युपत्र वाचताना सिगारेट ओढत एक मुलगी प्रवेश करते, जी धन्नालाल शेठच्या प्रेयसीची कन्या असून त्यांचे अनौरस अपत्य असल्याचा दावा करतेे. दोघीत वादविवाद होतो, पण दावा सांगणाऱ्या मुलीमध्ये वडिलांच्या बुद्धिचातुर्याची छाप असल्याचे दिसून आल्याचे तिला जाणवते. त्यामुळे त्या दोघी प्रकरण आपसात मिटवत वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी घेत लोभी नातेवाइकांचे बिंग फोडत त्यांना तुरुंगात पाठवतात. करिना आणि करिश्मा कपूरला घेत शोभा डे यांच्या कादंबरीवर चित्रपटाची पटकथा लिहिली जाऊ शकते. पण अलंकृता श्रीवास्तव यांचा चित्रपट या कादंबरीवर आधारित नाही. हॉलीवूडच्या एका चित्रपटात वडिलांच्या मृत्यूनंतर दोघीजणी एका हिल स्टेशनवरील आपले छोटेसे हॉटेल चालवतात. भाड्याने राहणाऱ्या संगीतकारावर एकीचे प्रेम जडते. लग्न करून ते शहरात परततात. काही महिन्यांनंतर छोट्या बहिणीला भेटण्यासाठी ते परततात तेव्हा ती हॉटेल विकून एका चर्चमध्ये नन झाल्याचे समजते. भेटीअंती हे समोर येते की, तिचेही त्या संगीतकारावर प्रेम होते. मोठी बहीण तिच्यासाठी स्वत:चा संसार त्यागून संगीतकारासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवते. पण, मी आता नन झाले असून दु:खी व असहाय लोकांची सेवा करणे हेच तिचे कर्तव्य असल्याचे सांगत, मोठ्या बहिणीच्या सुखी संसारासाठी छोटी प्रार्थना करते. ऐतिहासिक 'बॅकेट'मध्ये ब्रिटनचा राजा देशावर शासन करताना आपल्या बालमित्राला चर्चचा प्रमुख बनवतो. पण चर्चप्रमुख झालेला मित्र प्रभूच्या सेवेत असताना कोणीही मध्ये येऊ नये अथवा मी माझा िवरोध दर्शवेन असे सांगतो. यातीलच काही भाग मुखर्जी यांनी राजेश खन्ना व अमिताभच्या 'नमक हराम'मध्ये दर्शवला आहे. याच कथेवर टी.एस इलियट यांनीही 'मर्डर इन कॅथेड्रल' नावाचे काव्यात्मक नाटक लिहिले. बॅकेटमध्ये रिचर्ड बर्टनने राजाची तर पीटर ओ. टूल यांनी चर्चप्रमुखाची भूमिका केली होती. 'बॅकेट' बराेबरच इलियट यांचे नाटक 'मर्डर इन कॅथेड्रल' वरून चित्रपट निघाला होता.