Home | News | Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

नव-याच्या प्रेमात ऐश्वर्याने सोडला आणखी एक चित्रपट! आतापर्यंत धुडकावून लावले आहेत 15 चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 12:47 AM IST

अभिषेक बच्चनसोबतच्या 'गुलाब जामुन'साठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने संजय लीला भन्साळींचा चित्रपट नाकारला.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan


  मुंबई: अभिषेक बच्चनसोबतच्या 'गुलाब जामुन' या चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने संजय लीला भन्साळींचा अद्याप नाव न ठरलेला चित्रपट नाकारला. त्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्याने एका चित्रपटाला आपला नकार दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रेरणा अरोराने काही महिन्यांपू्र्वी 1964 मध्ये आलेल्या 'वो कौन थी' या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला अप्रोच करण्यात आले होते. पण मेकर्सनी हा चित्रपट होल्ड केला. कारण ते आता दुस-या चित्रपटात बिझी आहेत. प्रेरणा अभिषेक कपूरसोबत 'केदारनाथ' आणि भूषण कुमारसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटांमुळे कायदेशीर कचाट्यात सापडली आहे.


  प्रेरणा आता चित्रपट बनवायला तयार, पण ऐश्वर्याने सोडला चित्रपट..

  - प्रेरणाने अलीकडेच तिचे प्रॉडक्शन हाऊस री-लाँच केले आणि ती आता 'वो कौन थी'च्या रिमेकवर काम करत आहे. पण रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने हा चित्रपट करायला नकार दिला असून तिच्या जागी आता बिपाशा बसूची वर्णी लागली आहे. याविषयी प्रेरणाला विचारले गेले असता, सध्या तर्कवितर्क लावू नका, योग्य वेळी चित्रपटाविषयीची घोषणा करण्यात येईल, असे ती म्हणाली. ऐश्वर्याविषयी सांगायचे झाल्यास, ती पती अभिषेक बच्चनसोबत 'गुलाब जामुन' हा चित्रपट करत असून तिने दुसरा चित्रपट साइन केलेला नाही, अशी चर्चा आहे.

  ऐश्वर्याच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाल्यास, तिने यापूर्वीही अनेक चित्रपट धुडकावून लागवले आहेत. तर काही प्रोजेक्टमधून ती बाहेर झाली. उदाहरणार्थ 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटासाठी फराह खानने ऐश्वर्याला अप्रोच केले होते. फराह तिला शाहरुखच्या अपोझिट कास्ट करु इच्छित होती. पण ऐश्वर्याची इच्छा होती की, तिला अभिषेकच्या अपोझिट कास्ट करण्यात यावे. जेव्हा फराहने तिची अट मान्य केली नाही, तेव्हा ऐश्वर्याने चित्रपट नाकारला.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ऐश्वर्याने नाकारलेल्या आणखी 14 चित्रपटांविषयी...

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  राजा हिंदुस्तानी (1996)
  दिग्दर्शक धर्मेश दर्शनचा ब्लॉकब्लस्टर 'राजा हिंदुस्तानी' सिनेमा करिश्मा कपूरपूर्वी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. ऐश्वर्या हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. कारण तिला मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घ्यायचा होता. 1996चा हा सर्वाधिक यशस्वी सिनेमा ठरला.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  बाजीराव मस्तानी (2015)
  संजय लीला भन्सालीच्या ‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमासाठी दीपिका पहिली पसंत नव्हती. तिच्यापूर्वी हा सिनेमा ऐश्वर्या राय बच्चनला ऑफर झाला होता. 

  परंतु काही कारणास्तव ती या सिनेमात काम करू शकली नाही.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  कुछ कुछ होता है (1998) 
  ऐश्वर्याला करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' सिनेमा ऑफर झाला तेव्हा ती अमेरिकेत 'आ अब लौट चले' सिनेमाच्या 40 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बिझी होती. दिग्दर्शक चिंटू अंकलचा (ऋषी कपूर) तो पहिला सिनेमा होता. ऐश्वर्या त्यांची मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करणे ती मिस करू शकत नव्हती. त्यावेळी करणने तिला 'कभी खुशी कभी गम'च्या कलाकार आणि कथेविषयी सांगितले होते. परंतु आम्ही एकत्र काम करू शकलो नाहीत. तो त्याच्या अनेक सिनेमांच्या कथा मला ऐकवत असतो. आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखे आहोत, असे ऐश्वर्या म्हणाली होती.

   

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  दोस्ताना (2008)
  दिग्दर्शक तरुण मनसुखानीचा 'दोस्ताना' सिनेमा ऐश्वर्याला ऑफर झाला होता. परंतु ऐश्वर्याने हा सिनेमा धुडकावून लावल्यानंतर प्रियांकाने त्यात काम केले.

   

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  हीरोइन (2012)

  दिग्दर्शक मधुर भंडारकरने आपल्या या चित्रपटासाठी सुरुवातीला ऐश्वर्या रायला साइन केले होते. तशी घोषणादेखील झाली होती. पण त्याच काळात ऐश्वर्या प्रेग्नेंट होती त्यामुळे तिने हा चित्रपट सोडला होता. त्यावरुन मधुर भंडारकर आणि ऐश्वर्या यांच्यात मतभेदही निर्माण झाले होते. नंतर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला.  

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  चलते-चलते (2003)
  अजीज मिर्जाच्या दिग्दर्शनात बनलेला 'चलते चलते' सिनेमात राणी मुखर्जीची भूमिका ऐश्वर्या साकारणार होती. मात्र तिने हा सिनेमा नाकारला आणि ही 

  भूमिका राणीला भेटली.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  भूलभुलैया (2007)

  दिग्दर्शक प्रियदर्शनच्या 'भूलभुलैया' सिनेमात विद्या बालनची भूमिका आधी ऐश्वर्या रायला मिळाली होती. मात्र ऐश्वर्याने या भूमिकेसाठी नकार दिला होता.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  वीर-जारा (2004)
  यश चोप्रा यांच्या 'वीर-जारा' या म्यूझिकल ब्लॉकब्लस्टर सिनेमातील जारा हयात खानची भूमिका ऐश्वर्याला ऑफर झाली होती. मात्र, नंतर काही कारणाने अॅशने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि प्रितीची या भूमिकेसाठी निवड झाली.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  शुद्धी (होल्ड)

  रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने आगामी 'शुद्धी' या चित्रपटासाठी सर्वप्रथम ऐश्वर्या रायला अप्रोच केले होते. पण तिने ही भूमिका नाकारली. नंतर हा चित्रपट हृतिक रोशन आणि करीना कपूरला ऑफर झाला. पण तेदेखील  चित्रपटातून बाहेर झाले. आता वरुण धवन आणि आलिया भटचे नाव चित्रपटासाठी फायनल 

  झाले आहे. पण अद्याप चित्रपट फ्लोअरवर आलेला नाही. 

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  अशोका (2001)
  दिग्दर्शक संतोष सिवानचा हा सिनेमा ऐश्वर्या मिळाला होता. परंतु नंतर तिने सिनेमाला नकार दिला आणि मुख्य भूमिकेसाठी करीना कपूरला घेण्यात आले होते.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  मुन्नाभाई एमबीबीएस (2003)
  दिग्दर्शक राजू हिराणीच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमात ग्रेसी सिंहपूर्वी ऐश्वर्याला घेण्याचा विचार झाला होता. मात्र, नंतर अॅशने हा सिनेमा सोडला. हा 

  सिनेमासुद्धा ब्लॉकब्लस्टर ठरला होता.

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  कार्पोरेट (2006)
  असे म्हटले जाते की, मधुर भंडारकर यांनी हा चित्रपट ऐश्वर्या रायला ऑफर केला होता. पण तिने नकार दिल्यानंतर बिपाशा बसूच्या वाट्याला ही भूमिका  आली होती.  

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  ब्लफमास्टर (2005)

  डायरेक्टर रोहन सिप्पीने आपल्या डेब्यू फिल्म 'कुछ न कहो'मध्ये ऐश्वर्याला कास्ट केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ते ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनला एकत्र  

  आणणार होते. पण ऐश्वर्याने 'ब्लफमास्टर' करायला नकार दिला होता. त्यानंतर प्रियांका चोप्राची वर्णी चित्रपटात लागली. 

 • Movies Rejected By Aishwarya Rai Bachchan

  बदलापुर (2015)

  चित्रपटात सुरुवातीला सैफ अली खान आणि ऐश्वर्या रायला कास्ट करण्यात आले होते. पण सैफने चित्रपट सोडल्यानंतर वरुण धवनला साइन करण्यात आले. ऐश्वर्याला तिच्यापेक्षा लहान अभिनेत्यासोबत काम करायचे नव्हते, म्हणून तिने हा चित्रपट सोडला, अशी चर्चा आहे. नंतर यामी गौतमने हा चित्रपट साइन केला होता. 

Trending