आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट ज्यांना राजकारणामुळे बसला फटका, विरोधामुळे काहींवर लागला बॅन तर काहींना रिलीजला झाला उशीर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- बॉलीवूडमध्ये अनेकवेळा देशातील राजकारणावर बोट ठेवणारे चित्रपट बनत असतात. राजकारणाशी निगडीत अनेक मुद्यांवर किंवा नेत्यांवर चित्रपट बनले आहेत. पण जेव्हा-जेव्हा असे चित्रपट बनले, तेव्हा काहीना काही विरोध करण्यात आला. यापैकी काहींचा विरोध धर्म, समाज आणि संस्कृतीच्या नावावर झाला, तर काहीवेळा समाजाला आरसा दाखवण्याचे काम करणाऱ्या चित्रपटे राजकारणाच्या शिकार झाल्या.


राजकारण्यांच्या डोळ्यात खुपले होते हे चित्रपट

किस्सा कुर्सी का (1974)
"किस्सा कुर्सी" चित्रपट 1974 मध्ये बनली होती आणि 1975 ला रिलीज होणार होती. इमरजंसीच्या वेळी प्रत्येक चित्रपटाला आधी सरकार पाहात होते आणि नंतरच त्यांना रिलीज करण्याची परवानगी देण्यात येत होती. हा चित्रपट पाहून सरकारला वाटले की, यात संजय गांधीच्या ऑटो मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टवर बोट ठेवणारी आणि सरकारी आदेशांचे धिंडौडे काढणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या ओरिजनल प्रिंट्स जाळून नष्ट करण्यात आल्या. या चित्रपटात राज बब्बर मुख्य भुमिकेत होते. इमरजंसी संपल्यावर 1977 ला दिग्दर्शकाने परत हाच चित्रपट बनवला पण राज बब्बर यांनी त्यात काम केले नाही. त्यानंतर त्यात राज किरण, सुरेखा सीकरी आणि शबाना आजमी मुख्य भुमिकांमध्ये होते.

 
आंधी (1975)
सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांच्या आंधीला देखील बॅन करण्यात आले. इमरजंसीदरम्यान सांगण्यात आले की, या चित्रपटात इंधिरा गांधीना वाईट दाखवण्यात आले आहे त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजला बंदी आणण्यात आली. पण 1977 मध्ये काँग्रेसच्या परभवानंतर  जनता पार्टीच्या सरकारने चित्रपटावरील बॅन हटवून रिलीज करण्यास परवानगी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले होते.

 

ब्लॅक फ्राइडे (2007)
रायटर एस. हुसेन जैदी यांच्या पुस्तकावर बनलेला 'ब्लॅक फ्राइडे' अनुराग कश्यपने दिग्दर्शीत केला होता. या चित्रपटाला सेंसर बोर्डाने बॅन केले होते. हा चित्रपट 1993 मध्ये झालेल्या मुंबई बाँब ब्लास्टवर आधारीत होता. त्यावेळी हाय कोर्टात या खटल्याची सुनावनी होती त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली. पण नंतर 2007 मध्ये चित्रपटच्या रिलीजचा रास्ता मोकळा करण्यात आला.

 

सिंस (2005)
हा चित्रपट केरळच्या एका  पादरीवर आधारीत होती, ज्याला एता महिलेवर प्रेम जडते. कशाप्रकारे समाजाने बंधन तोडून पादरी आपले प्रेम कायम ठेवतो त्यावर हा चित्रपट आधारित होती. कॅथलिक धर्माला यात वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले त्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या होत्या. त्यामुळे सेंसर बोर्डाने या चित्रपटाला बॅन केले होते, पण काही कट्स करून 2005 मध्ये याला रिलीज करण्यात आली. 


फिराक (2009)
फिराक गुजरात दंगलींवर बनलेल्या दुसरा चित्रपट होता. चित्रपटाच्या प्रोड्यूसर्सच्या मते हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत होता. अॅक्ट्रेस नंदिता दासला या चित्रपटामुळे अनेक संघटनांचा विरोध पत्कारावा लागला होता. फिल्म 2008 में रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला सेंसर बोर्डाने बॅन केले होते, पण 2009 मध्ये रिलीज केले गेले. त्यानंतर प्रेक्षकांकडून आणि समिक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

 

अनफ्रीडम (2015)
हा चित्रपट एका लेस्बियन जोडीवर आधारीत होता. यात त्या जोड्याचा सामना दहशदवाद्यांशी होतो आणि त्यांचे जीवन बदलून जाते, यावर चित्रपटाची कथा होती. सेंसर बोर्डाने या चित्रपटाला भारतात बॅन केले, पण 29 मे 2015 मध्ये फक्त अमेरिकेत रिलीज केले गेले.


पद्मावत (2018)
पद्मावत चित्रपट संजय लीला भंसाळी यांनी बनवला होता. यांत रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपुर मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटात चितौडची राणी पद्मावतीची गोष्ट दाखवण्यात आली होती. पद्मावतीचे पात्र करणाऱ्या दीपिकावर चित्रीत केलेल्या काही दृष्यावर करनी सेने आणि काही राजपुत संघटनांना विरोध दर्शवला होता. पद्मावती यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम यात करण्यात आल्याचा आरोप लावत करनी सेनेने याला विरोध केला होता. चित्रपटाच्या रिलीज विरोधात आंदोलन करण्यात आलो होते. आधी हा चित्रपट 1 डिसेंबर 2017 ला रिलीज होणार होता, पण नंतर त्याला 25 जानेवारी 2018 रिलीज केले गेले.

 

पुढील स्लाइडवर पाहा...

बातम्या आणखी आहेत...