आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिरात भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य; असे करणारे देशातील पहिले मंदिर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर - येतात. 

दीड तासात संपायचे 300 लोकांचे जेवण 
मंदीर समितीचे व्यवस्थापक राहुल रुनवाल यांनी सांगितले की, भंडाऱ्यात 300 लोकांचे जेवण दीड तासात संपत होते. पण बाहेर गावाहून येणारे भाविक यापासून वंचित राहत होते. येथील स्थानिक लोक भोजन करत असल्याचे मंदीर समितीने केलेल्या चौकशीत समोर आले. येथील काही स्थानिक लोकांनी तर आपल्या घरी स्वयंपाक करणे बंद केले होते. यानंतर मात्र मंदिर प्रशासनाने आधार अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. आधार व्यवस्था लागू केल्यानंतर मंदिरात भोजन करणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. 

जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी सांगितले की, मोफत भोजन व्यवस्था ही बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी आहे. परंतु येथील स्थानिय लोक त्याचा लाभ घेत होते. यामुळे व्यवस्था बिघडत होती. यामुळे ही आधार व्यवस्था लागू करण्यात आली आहे. एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर तो आपल्या साथीदाराचे आधार कार्ड दाखवून या सेवेचा लाभ घेऊ शकतो. 

आधार कार्ड लागू झाल्यानंतर भंडाऱ्यात जेवणाऱ्यांची संख्या झाली अर्धी 
मंदीर समिती दररोज 300 लोकांचा स्वयंपाक तयार करते. यासाठी 9 हजार रुपये खर्च येतो. अशाप्रकारे महिन्याला 2 लाख 70 हजार रुपयांचा खर्च होतो. पण आधार कार्ड व्यवस्था लागू केल्यानंतर भंडाऱ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या निम्मी झाली आहे. यामुळे महिनभरात फक्त 1 लाख 80 हजार रुपये खर्च येत आहे. सोबतच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...