आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार अमोल कोल्हेंनी पुराव्यानिशी केली सरकारची पोलखोल, गड-किल्यांच्या निर्णयावर व्यक्त केला संताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे विवाहस्थळ आणि हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा सरकारने निर्णय घेतला. हेरिटेज टुरिझमला एमटीडीसीने राज्यातील 25 ऐतिहासिक गड किल्ल्यांची निवड केली होती. राज्यातील किल्ल्यांचे जतन होण्याऐवजी त्यांचे हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये रूपांतरण करणे दुर्दैवी असल्याचे म्हणत, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारची पोलखोल केली आहे. त्यांनी महाराष्ट्र एमटीडीसीची महाराष्ट्र टुरीजम पॉलिसी 2016 दाखवत, मुद्दे मांडले. ते म्हणाले की, या पॉलिसीत गड किल्यांना लग्न समारंभासाठी दिले जाईल, असे 2016 च्या टुरिजम पॉलिसीत उल्लेख आहे. पण मुख्यमंत्री वेगळेच बोलत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री किंवा पर्यटनमंत्र्यांनी जे म्हटले ते खरे मानायचे का पॉलिसीत जे लिहीले आहे, ते खरे मानायचे.

काय म्हणाले होते फडणवीस
पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. "छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही, अशा किल्ल्यांबाबत हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील 25 गडकिल्ले भाड्याने देण्याच्या वृत्तावर खुलासा करताना ते बोलत होते. 


छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांसादर्भात कोणत्याही गोष्टींची परवानगी शासनाने दिलेली नाही, असं फडणवीस म्हणाले. ज्या किल्ल्यांना कोणताच इतिहास नाही. ज्यांच्या केवळ चार भिंतीच उरल्या आहेत. अशा किल्ल्यांचा पर्यटनादृष्टीने विचार करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा किल्ल्यांवरही लग्न किंवा इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात असल्याचेही ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...