आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेचे तिकीट कापल्याने खासदाराला बसला धक्का, पक्षाच्या कार्यालयातील \'चौकीदारा\'च्या हातात दिला राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हिडिओ डेस्क- उत्तर प्रदेशच्या हरदोईचे भाजप खासदार अंशुल वर्मा यांनी पक्षाला आपला राजीनामा सोपवला आहे. सांगितले जात आहे की, यावेळी हरदोईचे माजी खासदार जय प्रकाश रावत यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तिकीट कापल्यागेल्यानंतर ते म्हणाले की, अनुसूचित जातीचा(दलित) असल्यामुळे माझी उमेदवारी काढून घेण्यात आली. पुढे ते म्हणाले की, भाजपन ज्या 6 उमेदवारांचे तिकीट कापले आहे, ते सगळे दलित आहेत.


त्यानंतर त्यांनी आपला राग व्यक्त करत, भाजप कार्यालयातील चौकीदारला 100 रूपये देऊन आपला राजीनामा त्यांच्या हाती सोपवला. म्हणाले- फक्त नावाचा चौकीदार, मी स्वत:ला चौकीदार नाही म्हणवणार, मी अंशुल वर्मा होतो आणि पुढेही असेल. विकास केला आहे आणि पुढेही करणार. मी माझ्या क्षेत्रात 24 हजार कोटींचा विकास केला आहे, संसदेत माझी 94 टक्के हजेरी आहे. आज देशातील सगळ्या जबाबदार व्यक्ती चौकीदार आहे, त्यामुळे मी खऱ्या चौकीदाराच्या हाती माझा राजीनामो सोपवत आहे. 

बातम्या आणखी आहेत...